शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

अग्निशमन यंत्रणा कुचकामी !

By admin | Updated: July 22, 2014 00:15 IST

बीड : मुंबई येथील लोटस् या इमारतीला आग लागून एका अग्निशमन जवानाला आपला जीव गमवावा लागला होता.

बीड : मुंबई येथील लोटस् या इमारतीला आग लागून एका अग्निशमन जवानाला आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध शासक ीय कार्यालयांची ‘लोकमत’ने सोमवारी पाहणी केली. या पाहणीत निम्म्यापेक्षा अधिक कार्यालयांमध्ये आग लागली तर ती आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही, असे धक्कादायक चित्र पहायला मिळाले. काही ठिकाणी यंत्रे आहेत; पण त्यावर धूळ साचली आहे. फायर आॅडिट, प्रशिक्षणाकडेही कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. शासकीय कार्यालयांबरोबरच खाजगी हॉस्पिटल, निवासी संकुलांमध्येही अग्निशमन यंत्रांचा अभाव आहे. त्यामुळे मुंबईतील घटनपासून आता बीडकरांनी ‘धडा’ घेण्याची गरज निर्माण झाली आहे.साहित्याचाही अभावअग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आग विझविताना धोका पत्कारावा लागतो. जवानांना फायरसूट, हेल्मेट, गमबूट, प्रथमोपचार हे पूरक साहित्य देखील पालिकेने पुरविलेले नाही. त्यामुळे साहित्याविनाच जवान आग विझविण्याची कसरत करतात.अशी घ्यावी काळजी...इमारत, सार्वजनिक ठिकाणी आग लागली तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्वात आधी स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा. पोलीस, अग्निशमन दलाशी संपर्क करावा. शक्य असेल तर जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अग्निशमन अधिकारी ए. के. सुतार यांनी केले़खाजगी हॉस्पिटमध्येही उदासिनताबीड शहरात ११८ खाजगी हॉस्पिटल्स आहेत. यापैकी केवळ ९ जणांनी अग्निशमन यंत्रे बसविली आहेत. उर्वरित ९९ जणांनी अद्यापही अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यामुळे सुशिक्षित म्हणविले जाणारे डॉक्टरही आगीच्या बाबतीत उपाययोजना करण्यास उदासिन असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही डॉक्टरांना ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन केले आहे, ३० जणांना नोटीसही पाठविली असल्याचे अग्निशमन अधिकारी ए. के. सुतार यांनी सांगितले.काय सांगतो नियम ?महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाय योजना अधिनियम २००७/२००९ अन्वये सर्व शासकीय आस्थापना, व्यापारी, निवासी संकुले, बस स्थानक, शाळा-महाविद्यालये, रुग्णालय येथे अग्निशमन यंत्रे बसविली पाहिजेत़ अग्निशमन यंत्रणा बसविणाऱ्या इमारतींची विद्युत जोडणी, नळ जोडणी बंद करुन इमारत सील करण्याचे अधिकारही अग्निशमन दलाला आहेत़पाच जणांनाच विम्याचे सुरक्षाकवचबीड पालिकेच्या अग्निशमन विभागात १८ कर्मचारी काम पाहतात;पण त्यापैकी केवळ ५ कर्मचाऱ्यांचा विमा पालिकेने काढला आहे. उर्वरित जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे जिकरीचे काम करतात.प्रशिक्षणही नाहीबीड पालिकेच्या अग्निशमन विभागातील जवानांना प्रशिक्षण देखील दिलेले नाही. केवळ पाच जवान प्रशिक्षित आहेत. उर्वरित १३ जवान कुठलेही प्रशिक्षण न घेता कर्तव्य बजावत आहेत. केवळ अनुभवाच्या आधारे हे कर्मचारी काम पाहत आहेत. उल्लेखनीय हे की, विविध शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमक यंत्रे बसविली आहेत; पण तेथील कर्मचाऱ्यांनीही यंत्रे कशी हाताळायची? याचे प्रशिक्षण घेतलेले नाही, अशी माहिती अग्निशमन विभागातील सूत्रांनी दिली.बीड: येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात अग्निशमन यंत्र बसविलेले आहेत. मात्र त्या यंत्राची दुरूस्ती मागील अनेक महिन्यांपासून केलेली नसल्याचे फायर ब्रिगेड कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधीत कार्यालयाच्या दुर्लक्षीतपणामुळे एखादी आगीची दुर्गघटना घडली तर अनेक अधिकारी, कर्मचारी व कामानिमित्त त्या कार्यालयात गेलेल्या सर्वसामान्य नागरीकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. याबाबत अनेकवेळा अग्नीशमन विभागाकडून अग्निरोधक यंत्राच्या दुरूस्ती बाबत पत्र पाढवून देखील यंत्राची दुरूस्ती संबंधीत कार्यालय करत नसल्याची माहीती समोर आली आहे.बीड: येथील जिल्हा परिषद कार्यालयात पहाणी केली असता़ सामान्य प्रशासन विभागाच्या इमारतीत एका कोपऱ्याला एक अग्निरोधक यंत्र बसविलेले आहे़ या यंत्राला गंज चढलेला आहे़ मागील अनेक वर्षापासून याची दुरूस्तीच झालेली नसल्याचे त्यावरील गंज पाहून लक्षात आले़ तसेच यंत्राच्या भोवती जाळ्या झालेल्या असल्याचे निदर्शनास आले़ अचानक आगीची काही दुर्घटना घडली तर हे यंत्र कसे व कोण चालवणार असा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ कारण अनेक वर्षात अग्निरोधक यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देखील कर्मचाऱ्यांना दिलेले नाही़बीड: येथील जिल्हा रुग्णालयाला सोमवारी दुपारी २ वाजता लोकमत प्रतिनिधींनी भेट दिली. असता जिल्हा रूग्णालयात एकही अग्निशमन यंत्र (फायर फायटर) आढळून आले नाही. जर अचानक जिल्हा रूग्णालयात आगीची दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. येथील अति दक्षता विभागात देखील अग्निशमन यंत्र नसल्याचे पहावयास मिळाले. यावरून येथील जिल्हा रूग्णालय सर्वसामान्य रूग्णांच्या व रूग्णांच्या नातेवाईकांची किती काळजी घेते. हे सांगायला नको.बीड: सहा महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे़ नवीन इमारतीमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले आहेत़ मात्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या जुन्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्र नसल्याचे सोमवारी निदर्शनास आले़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत उपविभागीय अधिकारी पी़ एल़ सोरमारे यांचे दालन आहे़ मात्र त्यांच्या कार्यालयात अग्निशमन यंत्र आढळून आले नाही़ कार्यालयाच्या आवारातही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून आले़बीड: येथील तहसील कार्यालयात आज घडीला एक ही अग्निशमन यंत्र नसल्याचे सोमवारी आढळून आले़ विशेष म्हणजे तीन मजली इमारत असलेल्या तहसील कार्यालयात एकही अग्निशमन यंत्र नसावे हे अत्यंत धोकादायक आहे़ विशेष म्हणजे तहसील कार्यालयात तालुक्यातील ग्रामस्थांची सतत गर्दी असते़ दरम्यानच्या काळात काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे़साडेतीन लाख लोकांसाठी तीनच वाहनेबीड शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांहून अधिक आहे. शहराला जोडून असलेला परिसरही झपाट्याने विस्तारतो आहे. मात्र, पालिकेकडे केवळ तीनच अग्निशमन वाहने आहेत. जवानांचीही कमतरता आहे. केवळ १८ कर्मचाऱ्यांवर कारभार सुरु आहे. उल्लेखनीय म्हणजे बीडच्या अग्निशमन यंत्रणेला शेजारच्या जिल्ह्यांतही आग विझविण्यासाठी जावे लागते. त्यामुळे यंत्रणा तोकडी पडत आहे. वाढत्या विस्तारीकरणाबरोबर वाहने व जवान देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.250 इतक्या अपार्टमेंट बीड शहरात आहेत़ मात्र तेथे देखील अग्निशमन यंत्रणा नाही़110 इतक्या शाळा महाविद्यालये शहरात आहेत़ तेथे देखील आग विझवण्यासाठी यंत्रणा नाही़004 वडवणी, शिरुर, पाटोदा, आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमनची सोय नाही़118 इतके खाजगी दवाखाने शहरात आहेत़ त्यापैकी केवळ ९ ठिकाणी यंत्रणा आहे़