शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:15 IST

तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली.

ठळक मुद्दे५० ते ६० लाखांचे नुकसान : शेतकऱ्यांचे पशुधन वाचले; चारा जळून झाला खाक

माजलगाव/ गंगामसला : तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पशुधन वाचले, मात्र चारा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.डाके पिंपरी हे तालुक्यातील सधन गाव असून, गावाला गोदाकाठ लाभल्यामुळे शेतकरी देखील प्रगत आहेत. परंतु गावाला दृष्ट लागावी अशी घटना गुरुवारी दुपारी घडली. नदीच्या कडेला असलेल्या विद्युत तारांच्या घर्षणातून आगीच्या ठिणग्या पडल्यामुळे अचानक आग लागली. ही बाब गावकºयांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले आणि गावकºयांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. गावकºयांनी कोठ्यांना आगी लागत असल्याने पशुधन सुरक्षित करुन घेतले. मात्र, गोठ्यालगत असलेल्या कडब्याच्या गंजीला आगी लागत गेल्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या आगीत गोठ्यावरील शेती उपयोगी साहित्य ठिबक संच, ट्रॅक्टरचे साहित्य , पेरणी यंत्र, काढून ठेवलेल्या पाईपलाईन, मोटार आदीसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. तसेच गावासाठी असलेली पाण्याची टाकी व अडीच हजार कडबा असणाºया ९ ते १० गंजी जळून खाक झाल्या. यात शेतकºयांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुशील एकनाथ डाके, गोपाळ गंगाधर डाके , पांडुरंग मनोहर डाके, आसाराम तुकाराम डाके, प्रल्हाद शेषेराव डाके, भरत सूर्यकांत डाके, बळीराम भीमराव डाके, आश्रूबा भाऊराव डाके, सतीश दत्तात्रय डाके, गजेंद्र अच्युत डाके आदींसह अनेक शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले.आग विझविण्यासाठी गावकºयांनी शर्थीचे प्रयत्न केले. कोणी छोट्या विद्युत मोटारी चालू करून तर कोणी हाताने पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच माजलगाव नगर परिषदेचा अग्निशमन बंब देखील वेळेवर पोहोचला. परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. वृत्त लिहिपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. तर ती अजूनही फैलतच असल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत होती.गावात वीजपुरवठा खंडित झाला असल्याने सद्य परिस्थितीला पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. महावितरणच्या संबंधित अधिकाºयांना फोन केला असता फोन घेण्याचीही तसदी अधिकारी घेत नाहीत. गावाची परिस्थिती भयावह झाली आहे. आम्हाला कोणी वाली आहे का नाही, असे सरपंच गणेश डाके म्हणाले.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरणfireआग