शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर न्याय मिळाला, ललिताचा 'ललीत' झालेल्यास पुरूष म्हणून रूजू करून घ्या; पोलीस महासंचालकांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 20:03 IST

बीड जिल्हा पोलीस दलातील माजलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना अखेर न्याय मिळाला आहे.

ठळक मुद्दे पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना पुरूष प्रवर्गात सामाविष्ट घेण्याचे निर्देश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिले आहेत.

बीड : बीड जिल्हा पोलीस दलातील माजलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना अखेर न्याय मिळाला आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना पुरूष प्रवर्गात सामाविष्ट घेण्याचे निर्देश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना दिले आहेत. सोमवारी हे निर्देश त्यांना प्राप्त झाल्याचे समजते.

ललिता साळवे या सध्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. साळवे यांनी शरिरात होणा-या पुरुषी बदलांमुळे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे शस्त्रक्रियेच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. दरम्यान, अशा प्रकाराचा पोलीस दलातील हा पहिलाच प्रसंग असल्याने सर्वच विचारात पडले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरुन नऊ महिन्यांनंतर ललीता यांना लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली.

अखेर ललिताच्या संघर्षाला यश, पोलीस महासंचालकांनी दिली लिंगपरिवर्तनाची परवानगी

मागील आठवड्यात मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रीया होऊन ललीता यांचा ललीत झाला. मात्र, पोलीस भरती अधिनियमाप्रमाणे शारिरिक पात्रतांमध्ये ललीता यांची उंची पुरुष प्रवगार्तील उमदेवारांसाठी असलेल्या निर्धारित उंचीपेक्षा कमी भरत होती. त्यामुळे ललीता यांचा ललीत होऊनही पुरुष प्रवर्गात समावेश होणार का ? याकडे लक्ष लागले होते. अखेर महासंचालक सतिश माथूर यांनी विशेष बाब म्हणून ललीता यांना शस्त्रक्रियेनंतर पुरुष प्रवर्गात सामविष्ट करण्याचे निर्देश बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना दिले आहेत.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसState Governmentराज्य सरकारWomenमहिला