शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ टेम्पो मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:41 IST

आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केला होता. त्यानंतर याच सेम क्रमांकाचा दुसरा टेम्पो पोलिसांना मिळून आला होता. मात्र तो टेम्पो कोणाचा? याचा तपास लावण्यात आष्टी पोलिसांनी दुर्लक्ष केले होते.

ठळक मुद्देखडकत मांस प्रकरण : चुकीचा क्रमांक टाकून गैरवापर करण्याचा प्रयत्न उघड

बीड : आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केला होता. त्यानंतर याच सेम क्रमांकाचा दुसरा टेम्पो पोलिसांना मिळून आला होता. मात्र तो टेम्पो कोणाचा? याचा तपास लावण्यात आष्टी पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब निदर्शनास आणल्यानंतर वरिष्ठांच्या दबावापुढे या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. चुकीचा क्रमांक टाकून गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे यातून उघड झाले आहे.अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे यांनी खडकत येथील विनापरवाना चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक टेम्पो (एमएच ४२ एक्यू ९८२५) असा १० लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई १ फेबु्रवारी रोजी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात सेम क्रमांकाचा (एमएच ४२ एक्यू ९८२५) टेम्पो पोलिसांना मिळून आला. प्रत्यक्षात मात्र टेम्पो बदलाबदल करण्याच ‘डाव’ होता. मात्र ४ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यामुळे पोलिसांनी बनवाबनवी करून हा टेम्पो सापडल्याची नोंद केली.दरम्यान, दीड महिन्यानंतरही हा टेम्पो कोणाचा? याचा तपास लावून कारवाई करण्यास आष्टी पोलीस ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत होते. हाच धागा पकडून लोकमतने १४ मार्च रोजी पुन्हा वृत्त प्रकाशित केले. पोलिसांनी तपासाकडे दुर्लक्ष केल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी याची चौकशी करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. अवघ्या काही तासांत आष्टी पोलिसांनी याचा तपास पूर्ण केला आणि दुसरा टेम्पो मालक मुन्नू नजीर पठाण (रा.खडकत ता.आष्टी) याच्यावर शासण व प्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अंमलदार पोना अशोक केदार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी