परळी : तालुक्यात महावितरण कंपनीने कृषिपंपाचे वीज तोडणीची मोहीम जोरदार हाती घेतल्याने, तालुक्यातील अनेक गावांत पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी भाजपा नेते फुलचंद कराड यांनी काही ग्रामस्थांसोबत परळीचे महावितरण कार्यालयात धडक भेट दिली.
शेतकऱ्यांना बिलाबाबत सहकार्य करा आणि तत्काळ बंद असलेली कृषिपंपाची वीज सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रत्येक शेतकऱ्यांकडून ५ ऐवजी ३ हजार रुपये प्रति कृषिपंप बिल भरणा करून देतो. तुम्ही त्वरित लाइट चालू करून द्या, असे कराड यांनी सांगितले. हा निर्णय अधिकाऱ्यांना पटला आणि सामंजस्याने प्रश्न मार्गी लावण्यात आला. वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबडकर म्हणाले, वीज ग्राहकांनी आपले विजेचे बिल भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे. थकबाकी भरली असल्यास तोडलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
===Photopath===
230321\23bed_4_23032021_14.jpg
===Caption===
सोमवारी भाजपा नेते फुलचंद कराड यांनी काही ग्रामस्थांसोबत परळीचे महावितरण कार्यालयात जाऊन वीज बाकी संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला.