शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By शिरीष शिंदे | Updated: April 24, 2023 18:39 IST

शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड: जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन मावेजा वाटपात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून संगनमताने अपहार करून तक्रारी नंतर संचिका गायब करण्यात आल्या आहे. या प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संबंधित शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले.

संचिका गहाळ प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच चौकशीस जाणिवपूर्वक दिरंगाई केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, शेख मुस्ताक , शेख मुबीन, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, बाबासाहेब मेंगडे, गवळण मेंगडे, रावसाहेब मेंगडे, अमोल मेंगडे, भिमराव बांगर, विठ्ठल जाधव, विजय ईगडे आदी सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

शासनाची दिशाभूल करत फसवणूकपाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी येथील गट क्रमांक १०० गाव तलाव क्र.५ मध्ये माझ्या जमिनीवर तलाव बांधण्यात आला आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांनी १ कोटी ४६ लाख रुपये बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची दिशाभूल करत फसवणूक केली. संबंधित प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करून मला मावेजा देण्यात यावा- बाबासाहेब मेंगडे, शेतकरी, मेंगडेवारी, ता. पाटोदा

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडagitationआंदोलन