शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या धाडसाने वाचले पित्याचे प्राण; दुचाकीवर १०० किमीचा प्रवास करीत पोहोचविले दवाखान्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 12:48 IST

औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करत अर्धांगवायू झालेल्या पित्यास वेळेवर उपचार मिळाल्याने वाचले प्राण

- रवींद्र अमृतकर नागद ( औरंगाबाद ) : शेतकरी असलेल्या पित्याला अचानक अर्धांगवायूचा झटका आला. मात्र धाडसी आरतीने घाबरुन न जाता मोटरसायकलवर पित्याला मध्ये बसवून आईला पाठिमागून घट्ट पकडायला लावले. औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करीत १०० कि.मी. अंतरावर असलेल्या औरंगाबादमधील रुग्णालयात वेळेवर पोहोचविले. यामुळे वडिलांचे प्राण वाचले असून आरतीच्या या धाडसाचे गावासह सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

नागदपासून जवळ असलेल्या जामडी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील शेतकरी असलेले संजय परदेशी यांना दोन मुली असून मुलगा नाही. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. यामुळे घरात आता संजय परदेशी त्यांची पत्नी व मुलगी आरती हे तिघेच राहतात. आरती ही राष्ट्रीय उच्च माध्य. विद्यालयात बारावीत शिकत आहे. चार दिवसांपूर्वी संजय परदेशी यांना अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे त्यांची पत्नी व आरती हे काळजीत पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असल्याने तसेच वाहनाची व्यवस्था नसल्याने आरतीने मोटरसायकलवर वडिलांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तातडीने वडिलांना मोटारसायकलवर मध्ये बसवून पाठिमागे आईला त्यांना घट्ट धरुन बसण्यास सांगितले. आणि औरंगाबादकडे प्रवास सुरु केला. 

जामडीपासून औरंगाबादचे अंतर हे शंभर कि.मी. असल्याने आजारी वडिलांसह ट्रिपल सीट प्रवास सोपा नव्हता, त्यात रस्तेही खराब मात्र आरतीने हिंमत न हारता औरंगाबाद गाठले. येथील एका खाजगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने वडिलांचा जीव वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आरतीने दाखविलेल्या या धाडसाबद्दल तिचे गावातून कौतुक केले जात आहे. यानिमित्त राष्ट्रीय विद्यालयात आरतीचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अर्जुन नितीन पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बी.एस. साळवे, बी.टी. जगताप, पी.एन. पवार, शेखर पाटील, प्रशांत पाटील, चव्हाण, गायकवाड, दीप्ती पाटील आदींची उपस्थिती होती.

रस्त्यात आठ कि.मी.चा औट्रम घाटआरती व तिच्या आईने आजारी वडिलांना मोटारसायकलवर बसवून प्रवास सुरू केला. तेव्हा वाटेतच संजय परदेशी यांची प्रकृती आणखी खराब झाली. तेव्हा आरतीने आईला त्यांना घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. त्यातच वाटेत अत्यंत खडतर व आठ कि.मी. अंतर असलेला नागद घाटातील ट्रिपल सीट प्रवास अत्यंत धोकादायक होता. तरीही न डगमगता आरतीने वडिलांना सुखरुप रुग्णालयात पोहोचविले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय