शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खुराकासाठी बापाने विकली ५ एकर शेती, मुलाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'सुवर्ण' बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:14 IST

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या वडिलांच्या त्यागाची परतफेड

- नितीन कांबळेकडा :कुस्तीतील वडिलोपार्जित परंपरा जपण्यासाठी पाच एकर शेती विकून मुलाला पैलवान बनवणाऱ्या एका वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील आतिश तोडकर याने नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या वडिलांच्या त्यागाची परतफेड केली आहे.

आतिशचे वडील सुनील तोडकर यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही, घरात पैलवान तयार व्हावा या ध्येयाने त्यांनी कर्ज आणि उधारी केली. एवढेच नव्हे तर, मुलाला कुस्तीचे योग्य प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना पाच एकर वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. दहा वर्षांचा असल्यापासून आतिशने वडील व चुलत्यांसोबत तालमीत सराव सुरू केला. त्याची प्रगती पाहून त्याला प्रथम प्रा. दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी येथे, तर नंतर दिल्लीतील वीरेंद्र स्पोर्ट्स अकादमी येथे १० वर्षे प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले.

आतापर्यंत कोणती पदके मिळवली?नुकतेच आतिशने ऑल इंडिया इंटर रेल्वे चॅम्पियनशिप (दिल्ली) स्पर्धेतील ६१ किलो फ्री स्टाईल वजन गटात ५-८ गुणांकनांनी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. आतिशने आजवर १९ वेळा राष्ट्रीय (नॅशनल) स्तरावर खेळून ४ वेळा सुवर्ण, ३ वेळा रौप्य आणि ४ वेळा कांस्य पदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली आहे. 'पट डाव' हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. आतिशच्या यशाने समाधानी असलेले वडील सुनील तोडकर यांचे आता अंतिम ध्येय हे "आतिशला ऑलिम्पिक स्पर्धेत खेळताना पाहणे" हे आहे. त्यांच्या या त्यागामुळे कुस्तीच्या रांगड्या खेळाची परंपरा ग्रामीण भागात आजही जिवंत असल्याचे दिसून येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Father Sells Land, Son Wins Gold in National Wrestling!

Web Summary : To fulfill his wrestling dreams, Atish's father sold land. Atish won gold at a national wrestling competition in Delhi, repaying his father's sacrifice. He has won multiple national medals, and his father now dreams of seeing him at the Olympics.
टॅग्स :BeedबीडWrestlingकुस्ती