शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दहिफळ वडमाऊलीकरांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:54 IST

तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील रेणुका देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम चोरीच्या घटनेला तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही पोलीस प्रशासनाला आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही.

ठळक मुद्देपुजारी खून प्रकरण : तीन महिने होऊनही आरोपी मोकाट

केज : तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील रेणुका देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम चोरीच्या घटनेला तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही पोलीस प्रशासनाला आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. या प्रकरणातील फरार मारेकऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी ग्रामस्थांसह ७ फेब्रुवारीपासून गावातच उपोषणाला सुरुवात केली आहे.तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील रेणूका देवीचे देवस्थानचे पुजारी रामलिंग माधव ठोंबरे यांचा अज्ञात व्यक्तींनी २ नोव्हेंबर २०१९ रोजी निघृणपणे खून करून मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांना अद्याप पुजाºयाचा खून करणारे मारेकरी कोण होते? याचा अद्यापही तपास लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास तत्काळ करावा, अशी मागणी ठोंबरे व ग्रामस्थांनी पोलीस अधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.सीआयडीकडे तपास देण्याची मागणीया प्रकरणाचा तपास केज पोलिसांनी एक महिना चांगल्या प्रकारे केला. मात्र नंतर त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणातील आरोपी आजही मोकाट आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी (क्राईम) कडे देण्याची मागणी ठोंबरे यांनी केली आहे. दरम्यान या खून प्रकरणाचा परिणाम भाविकांवर झाला आहे. त्यामुळे आरोपीचा शोध तात्काळ लागणे गरजेचे असल्याचे मत पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनagitationआंदोलन