शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मुद्रा लोन प्रकरणी तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:13 IST

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, स्वत:च छोटे मोठे दुकान टाकून व्यवसाय उभा करता यावा म्हणून मुद्रा योजना देशभर उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देउपोषणकर्त्याची तब्येत बिघडली : जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा

गेवराई : सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, स्वत:च छोटे मोठे दुकान टाकून व्यवसाय उभा करता यावा म्हणून मुद्रा योजना देशभर उपलब्ध करून दिली. मात्र ही योजना तलवाडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कागदी घोडे नाचवून गरीब सुशिक्षित बेरोजगार युवकांना डावलत श्रीमंत लोकांना कोट्यवधींचे कर्ज दिल्याचा आरोप या युवकांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन शाखाधिकारी डोंगरे, चव्हाण, मुळे यांनी अन्याय केला आहे. तरी यांच्यावर तत्काळ करण्यात यावी, तरुण उपोषणास बसले आहेत.यामध्ये सुमेध करडे, धम्मानंद भोले, सचिन पटेकर हे तीन दिवसांपासून बँकेसमोर उपोषणाला बसले आहेत. तीन दिवस उलटूनही बँक विभागीय व्यवस्थापकांनी व बँक प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गावकºयांतून होत आहे. तलवाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे मागील तीन वर्षात २ कोटी २० लाख ६८ हजार रु पये एवढी मोठी रक्कम वाटप करण्यात आली. मात्र नियमाची पायमल्ली करत या प्रकरणाशी संबंधित शाखाधिकाºयांनी बोगस लाभार्थ्यांची कसल्याही प्रकारची खातरजमा न करता बँकेच्या दलालामार्फत रक्कम वाटप करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचे बोगस दुकाने दाखवून शासनाला चुना लावला आहे. तरी या गैरव्यवहाराची चोकशी करून डोंगरे, मुळे, चव्हाण यांच्यावर तत्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावे, या मागणी साठी सुमेध करडे व सहकाºयांनी ११ सप्टेंबर १९ रोजी उपोषण केले. मात्र त्यांना कारवाई करू असे पत्र देण्यात आले होते.तद्नंतर तीन महिने होऊन सुद्धा या तिघांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा ही मागणी घेऊन सुमेध करडे, धम्मानंद भोले, सचिन पटेकर २३ डिसेंबर १९ पासून बँकेसमोर उपोषणाला बसले आहेत. तीन दिवस होऊन सुद्धा बँकेकडून दखल घेतली जात नसल्याने सचिन पटेकर यांची तब्येत खालावली आहे. त्यांना चकरा येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून डोंगरे, मुळे, चव्हाण या शाखाधिकाºयांच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत व त्याचे निलंबन करण्यात यावे व न्याय देण्यात यावा अशी मागणी गावकºयांतून होत आहे.

टॅग्स :BeedबीडPradhan Mantri Mudra Yojanaप्रधानमंत्री मुद्रा योजनाagitationआंदोलन