शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:23 IST

शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले.

अंबाजोगाई : शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. दोन तास झालेल्या या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. अंबाजोगाईचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी घटनास्थळी जाऊन शेतक-यांचे निवेदन स्वीकारले.तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी गेला. यावर्षीचाही खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेला. सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. होता तो चारा सहा महिन्यापूर्वी संपला. शेतक-यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना अशा स्थितीत चारा विकत घेणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. अशी भीषण स्थिती असतांनाही प्रशासनाच्या वतीने चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत. चारा डेपोही उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व जलस्त्रोत निकामी झाले आहेत. जनावरांना चाराही नाही आणि पाणीही नाही अशा स्थितीत पशुधन सांभाळायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बर्दापूर, सायगाव, सुगाव, नांदगाव, पोखरी, मुडेगाव, दैठणा, वाघाळा व परिसरातील विविध गावच्या शेतक-यांनी बुधवारी सकाळी आपल्या जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी करत दावणीला चारा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. नायब तहसीलदार गणेश सरोदे, मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन शेतक-यांचे निवेदन स्वीकारले व या मागणीसाठी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. बर्दापूर पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्गावर बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन