शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे येथील विमा कंपनीच्या कार्यालयास माजलगावच्या शेतकर्‍यांनी ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:18 IST

कंपनीकडून महिनाभरात पैसे अदा करण्याचे आश्‍वासन

माजलगाव (बीड ) :  जिल्ह्यात गतवर्षी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन पिकासह सर्वच पिके करपून गेली. शेतकर्‍यांनी दरवर्षीप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीकडे विमा भरला, मात्र अद्याप ही या शेतकर्‍यांना विम्याची रक्कम अदा करण्यात न आल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. यावर कंपनीने एक महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्‍वासन दिले.

गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावली. परिणामी शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीनसह इतर पिके जळून गेली. परंतू आपल्या पिकाचे विमा संरक्षण ही शेतकर्‍यांनी काढले होते. जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे काम दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीला दिले होते. सर्व पिके गेली असतांना यावर्षी पेरणीचे दिवस आले असतांना विमा कंपनीने विम्याचे रक्कम शेतकर्‍यांना अदा केली नाही. वारंवार प्रशासनासह विमा कंपनीकडे  पैस्याची मागणी करून प्रशासन व विमा कंपनी दाद मिळत नव्हती. परिणामी शेतकरी आपल्या हक्काच्या पैशापासून वंचित राहू लागला. 

यावर शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यानी पुढाकार घेवून शेकडो शेतकर्‍यांसह सोमवार दि.17 रोजी थेट पुणे येथील  दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा नेत आमच्या हक्काचे पैसे द्या, अशी मागणी करत कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. निर्ढावलेले कंपनीच्या प्रशासनाचे डोळे उघडले अन् त्यानी महिनाभरात शेतकर्‍यांची विम्याची रक्कम खात्यावर जमा करण्याचे लेखी  आश्‍वासन कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी दिले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीBeedबीड