शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:37 IST

शेतक-यांना पीककर्ज तसेच इतर कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. पीककर्जाची शेवटची तारीख जवळ येत असताना शेतकºयांची फेरफार नक्कल मिळवण्यासा जिल्ह्यातील तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे. याचाच फायदा घेत कार्यालयातील अभिलेख कक्षातील कर्मचारी शेतकºयांची आर्थिक लूट करीत आहेत.

ठळक मुद्देबँक कर्जासाठी फेरफार नक्कल आवश्यक

बीड : शेतक-यांना पीककर्ज तसेच इतर कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. पीककर्जाची शेवटची तारीख जवळ येत असताना शेतकºयांची फेरफार नक्कल मिळवण्यासा जिल्ह्यातील तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे. याचाच फायदा घेत कार्यालयातील अभिलेख कक्षातील कर्मचारी शेतकºयांची आर्थिक लूट करीत आहेत.

जिल्ह्यातील शेतकºयांना बँकांमध्ये पीककर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या अटी व शर्ती आहेत. यामध्ये फेरफार नक्कल ही महत्त्वाची असते. कर्ज घेण्यासाठी इच्छूक असणाºया शेतकºयांना फेरफार नक्कल काढण्यासाठी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात अर्ज करावा लागतो. त्यानंतर ठराविक दिवसांनी त्यांना ती नक्कल दिली जाते.यासाठी १० ते १५ रुपये घेणे अपेक्षित असताना या कक्षातील कर्मचारी मात्र शेतकºयांची अडवणूक करुन १०० ते ५०० रुपयापर्यंत पैसे घेत आहेत.

पैसे कशाच्या आधारावर घेतले जातात तसेच घेतलेल्या पैशाची पावती का दिली जात नाही असे प्रश्न विचारणाºया शेतकºयांची नक्कल कर्मचारी देत नाहीत. अनेक दिवस उलटूनही नकलेसाठी अडवणूक केली जाते. याप्रकरणी अनेक शेतकºयांनी वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र, वरिष्ठांचे देखील याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात असे गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वडवणी तहसीलदारांचे दुर्लक्ष; जिल्हाधिका-यांना निवेदनवडवणी तहसील कार्यालयात प्रत्येक नकलेस १०० रुपयांप्रमाणे पैसे घेतले जातात. तलाठ्यांकडे फेरफार नक्कल मिळत नसल्यामुळे तहसील कार्यालयातून ती काढावी लागते. जुन्या कागदपत्रांची झेरॉक्स काढून ही नक्कल दिली जाते. पीककर्जाच्या काळात रोज २०० ते ३०० शेतकरी नक्कल काढतात. १०० रुपयांप्रमाणे रोज ३० हजार रुपये जमा होत असून, याप्रकरणी तहसीलदारांकडे शिवाजी अंकुश यादव यांनी तक्रार केली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही तहसीलदारांनी केलेली नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाºयांच्या संगनमताने शेतकºयांची लूट केली जात आहे का ? असा प्रश्न यादव यांनी निवेदनात विचारला आहे.

वरिष्ठांचे दुर्लक्षसर्वच तहसील कार्यालयात हा गैरप्रकार होत असल्यामुळे काही सुजाण शेतकºयांनी पेशकार, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्याकडे तक्रार देखील केली. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या गैरप्रकाराला त्यांचा पाठिंबा आहे काय ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा