शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले; लॉकडाऊन काळात घरपोच भाजीपाला विक्रीतून कोटीची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:42 IST

एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

ठळक मुद्देचार तालुक्यांत 25 दिवसांत 184 शेतकरी गटाने केली दीड कोटींची उलाढाल

- पुरूषोत्तम करवा माजलगाव : लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळावा म्हणून शासनाने  घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फ त माजलगाव, धारुर, गेवराई, वडवणी या चार तालुक्यातील 184 शेतकरी गटाने 25 दिवसांत दीड कोटींचा भाजीपाला व फळे विक्री केले भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केल्याने लॉकडाऊनमध्ये योग्य भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनाही आर्थिक फायदा झाला.

कोरोनामुळे जिल्हाधिकार्‍यांनी विषम तारखेस सकाळी 7 ते 9.30 या वेळेत बाजारास परवानगी दिली होती. परंतु बाजारात खरेदी करण्यास होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने घरपोहोच भाजीपाला विक्री उपक्रम सुरू करुन थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला विक्री करण्याची परवानगी शेतकरी गटांना दिली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत 15 एप्रिलापासून या उपक्रमास सुरुवात झाली. माजलगाव, धारुर, वडवणी, गेवराई या चार तालुक्यात 184 शेतकरी गटांनी 10 मेपर्यंत म्हणजे 25 दिवसांत तब्बल दीड कोटींचा भाजीपाला विक्री केला. या उपक्रमामुळे भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता आल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फायदा झाला. एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. आडत, दलाल यांच्यामुळे होणारे नुकसान थेट भाजीपाला विक्री केल्याने भरुन निघाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान दिसत होते.

या गटाने केला भाजीपाला विक्रीमाजलगाव तालुक्यातील 50 शेतकरी गटाने 1 हजार 397 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 73 लाख रुपये व्यवसाय केला. गेवराई तालुक्यात 71 गटांनी 1 हजार 578 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 53 लाख रुपये, वडवणी तालुक्यात 11 गटांनी 243 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 5 लाख रुपये आणि धारुर तालुक्यात 52 गटांनी क्विंटल भाजीपाला विक्री करुन 425 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 10 लाख रुपये असा एकूण अंदाजे एक कोटी 42 लाखांचा व्यवसाय केला.

शेतमालाला योग्य भाव मिळाला घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रमामुळे ग्राहकांना थेट शेतकर्‍यांकडून ताजा व योग्य दरात भाजीपाला मिळाला. यामुळे ग्राहक समाधानी असून शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळाला. एवढेच नाही तर बाजारातील गर्दीवर नियंत्रण राहण्यास मदत झाली. लॉकडाऊननंतरही हा उपक्रम चालू ठेवण्याचा मानस आहे.- सुरज मडके, उपविभागीय कृषी अधिकारी, माजलगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीBeedबीड