शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

शेतकऱ्यांनो सावधान, खोटी कागदपत्रे दिल्यास ‘फार्मर आयडी’ ब्लॉक होणार, वसुलीही होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:35 IST

चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेला लाभ केला जाणार वसूल

बीड : शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अनुदान, लाभासाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. मात्र, योजनेसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि ‘फार्मर आयडी’ पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार आहे. विशेष म्हणजे चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेला लाभ वसूल केला जाणार आहे.

राज्यातील कृषिक्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना लाभ देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक प्रकल्पात प्रत्येक सातबारा धारक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) देण्यात येत आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खाते उताऱ्याला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.

महाडीबीटीवर योजनांसाठी लॉटरी पद्धत बंदपूर्वी महाडीबीटीवर दाखल होणाऱ्या विविध शासकीय योजनांसाठी अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड केली जात होती. मात्र आता ही लॉटरी पद्धत बंद करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या आधारावर लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. त्यामुळे योजना सुरू होताच तत्काळ अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे.

खोटी माहिती दिल्यास ५ वर्षे आयडी ब्लॉकमहाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या अनुदान आणि लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या योजनेसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाईची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. म्हणजेच, पुढील पाच वर्षे त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

अनुदानाचा लाभही वसूल करणारचुकीच्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेला लाभ शासनाकडे परत वसूल केला जाईल. ज्या घटकासाठी (शेती उपकरणे, यंत्रसामग्री) शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळेल, त्या घटकाचा वापर किमान तीन वर्षे करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रेफार्मर आयडीसाठी नोंदणी करताना आधार कार्ड (आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर), ७/१२ उतारा किंवा ८-अ खाते उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहे. फार्मर आयडीसाठी mhfr.agristack.gov.in, महा ई-सेवा केंद्र, तलाठी कार्यालय, कृषी सहायक कार्यालय या ठिकाणी नोंदणी केली जाऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer ID Alert: False Documents Lead to Block & Recovery!

Web Summary : Be alert, farmers! Submitting false documents for Farmer ID can lead to a five-year block and recovery of benefits. The AgriStack scheme requires accurate data. Apply promptly for schemes as selection is now first-come, first-served. Essential documents include Aadhaar, 7/12 extract, and bank details.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीड