शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:20 IST

घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून संपवले जीवन

किल्लेधारूर  (बीड)  - धारुर  तालुक्यातील पिंपरवाडा येथील एक तरुण शेतकरी सतिश नामदेव तिडके ( 38) याने गळफास घेवून आत्महत्या केली. पेरणीचे दिवस असताना कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री मृत्यूला कवटाळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तालूक्यातील पिंपरवाडा येथील शेतकरी सतिश नामदेव तिडके या तरुण शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पिंपरवाडा येथे नामदेव तिडके यांचे कुटूंब राहते. त्यांना गावात जवळपास दहा एकर कोरडवाहू जमिन आहे. या शेतातच शेती करुन तिडके कुटूंबियांची उपजिविका भागते. मात्र, शेतीसाठी सतत कर्जाचा बोजा घेतला जात होता. या कर्जाला कंटाळूनच कुटूंबातील तरुण शेतकरी सतिश याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मृत शेतकरी सतिश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. 

रविवारी सायंकाळी घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद धारुर पोलीसांत  करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीBeedबीड