शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांचा निरोप ठरला अखेरचा; ऊस तोडणीस निघालेल्या मजुरास पत्नीसमोरच वाहनाने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 13:12 IST

डोक्यावरून कारचे चाक गेल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देऊस तोडणीसाठी पत्नीसह निघाले होते दुसऱ्या गावी गावातील नातेवाईकांचा निरोप घेऊन येत असताना झाला अपघात

दिंद्रुड :  मेहकर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नित्रुड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत उसतोड मजूर जागीच ठार झाला. ही घटना बुधवार रात्री ७ वाजेदरम्यान घडली. शेख हमजा शेख बासु (40, नित्रुड ) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. गावातील नातेवाईकांचा निरोप घेऊन निघाल्यानंतर पत्नी ५० मीटरवर उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनात असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नित्रुड येथील शेख हामजा हे उसतोड कामगार आहेत. बुधवारी सायंकाळी शेख हामजा हे पत्नी आणि इतर मजुरांसोबत दुसऱ्या गावी निघाले होते. त्यांची पत्नी सामान घेऊन इतर मजुरांसोबत वाहनात बसली होती. यावेळी शेख हामजा गावातील नातेवाईकांच्या भेटी घेत रस्त्यावर उभ्या वाहनाकडे येत होते. रस्त्यावर आल्यानंतर अवघ्या ५० मीटरवर वाहन असताना माजलगावकडून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना चिरडले. 

यावेळी मोठा आवाज झाल्याने वाहनातील मजूर त्या दिशेने पळाले. यावेळी शेख हामजा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले होते. डोक्यावरून कारचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत कार घटनास्थळावरून भरधाव वेगात निघून गेली. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड