शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
2
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
3
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
4
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
5
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
6
Operation Sindoor Live Updates: भारतात घुसखोरी करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना BSF जवानांनी ठार केले
7
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
8
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
9
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
10
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
11
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
12
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
13
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
14
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
15
Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी
16
टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."
17
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने खबरदारी
18
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
19
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
20
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?

बीडमध्ये बनावट 'आरटीओ'चा हायवेवर डेरा; वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:45 IST

आरोपींनी १० दिवसांपूर्वी मलाड येथून पांढऱ्या रंगाची जीप खरेदी करून हुबेहूब आरटीओसारखी बनविली.

बीड : शहरापासून जवळच असलेल्या बीडबायपास रोडजवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) असल्याचे सांगून वाहनधारकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाईल, वाहन, नगदी रक्कम असा एकूण ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला.

अजय बालाजी गाडगे (रा. अमृत नगर, डगलॅड, खंडोबा टेकडी, घाटकोपर, मुंबई) व दिनेश मंगल धनसर (रा. पांडुरंग वकीलवाडी, कलीना, मुंबई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने यांना बुधवारी सकाळी माहिती मिळाली की, बीड बायपास रोडवर एक जीप उभी असून, त्यावर आरटीओचा लोगो व दिवा आहे. आरटीओ अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून दोघेजण येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून वाहनांची कागदपत्रे तपासून आम्ही आरटीओ असल्याचे सांगून पैसे वसूल करीत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांच्याकडील वाहनाची माहिती घेतली असता ते वाहन ठाणे आरटीओ विभागात असल्याचे समजले. त्यावरून एमएच-०४ केआर-६४०४ या जीपवर आरटीओचा लोगो, स्टीकर लावून आरटीओ असल्याची बतावणी करून वाहनधारकांकडून पैसे वसूल करीत असल्याची खात्री झाली. त्यावरून बीड ग्रामीण ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी तक्रार दिली. त्यावरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

तलवाडा फाट्यावरगेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा येथे बनावट आरटीओ वाहन उभे असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पोलिस गेले असता बनावट आरटीओ वाहनात दोघेजण बसले होते. त्यांची चौकशी केली असता अजय राजाराम सूर्यवंशी, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वडाळा अशी ओळख सांगितली, तर ड्रायव्हरने दिनेश मंगल धनसर असे नाव सांगितले. ओळखपत्राबाबत विचारणा केली असता धनसर हा पोलिसांना धक्का देऊन पळून जाऊ लागला. पाठलाग करून दोघांना पकडले असता खरे नाव अजय बालाजी गाडगे असल्याचे सांगितले.

१० दिवसांपूर्वी जीप खरेदी१० दिवसांपूर्वी मलाड येथून पांढऱ्या रंगाची जीप खरेदी करून हुबेहूब आरटीओसारखी बनविली. ते वाहन घेऊन नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर व बीड येथे वाहन अडवून त्यांच्याकडून रोख व ऑनलाईन रक्कम घेतल्याचे कबूल केले. त्या दोघांकडून एकूण ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून पोलिस हवालदार मनोज वाघ, कैलास ठोंबरे, पोलिस नाईक विकास वाघमारे, चालक शिवाजी खवतड यांनी केली.

टॅग्स :BeedबीडRto officeआरटीओ ऑफीसBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या