शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी पाणीवाटपाचे फेरनियोजन अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:10 IST

जायकवाडी प्रकल्पातील पाणी वाटपाचे फेरिनयोजन शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. आता माजलगाव धरणासाठी ५६० दलघमीवरून २९९.४२ दलघमी एवढी पाण्याची तरतूद या शासनाने कमी केली आहे.

ठळक मुद्देअमरसिंह पंडित यांची टीका जनतेचा भ्रमनिरास

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जायकवाडी प्रकल्पातील पाणी वाटपाचे फेरिनयोजन शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. आता माजलगाव धरणासाठी ५६० दलघमीवरून २९९.४२ दलघमी एवढी पाण्याची तरतूद या शासनाने कमी केली आहे. त्यामुळे बीड शहरासह इतर ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी आ.अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पत्रकार परिषदेस अ‍ॅड.उषाताई दराडे, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, अ‍ॅड.डी.बी.बागल, बीड तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील उपस्थित होते. मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणासह भ्रष्टाचारमुक्त, टँकरमुक्त, टोलमुक्त आणि लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र करण्याचा दिलेला शब्द शासनाने फिरविला. त्यामुळे मतदार आता भाजपा-शिवसेनामुक्त शासन निवडतील, जायकवाडीच्या हक्काच्या पाण्याबाबत शासन जाणीवपूर्वक विलंब करत आहे. धरणातील पाणी वापराचे फेर नियोजन करताना बीड जिल्ह्यावर सरकारने अन्याय केला आहे. अच्छे दिनच्या नावाखाली या सरकारने जनतेची फसवणूक केल्याची टीकाही माजी आ.अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली.जलयुक्त शिवार ही योजना केवळ गुत्तेदारांसाठी राबविण्यात आली, त्याचा प्रत्यक्ष लाभ सिंचनासाठी झालाच नाही. हमीभावाने धान्य खरेदी करताना शेतकºयांची परवड केली, कोट्यवधी रु पये आजही शेतकºयांना मिळालेले नाहीत. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासनाचा विसर शासनाला पडला आहे. इंधन दरवाढ, महागाई आणि बेरोजगारी कमी झाली नाही.पिक विमा नुकसान भरपाई, बोंडअळीचे अनुदान, गारपीटग्रस्तांची मदत अद्याप शेतकºयांना मिळाली नाही. घोषणा हवेत विरल्या आहेत. त्यामुळे आता वेळ आली आहे भाजप-सेना मुक्त शासन देण्याची, अशी टिकाही पंडित यांनी पत्रपरिषदेत केली.पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यकर्त्यांना दुष्काळाचे गांभीर्य नाही, बीड जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी करण्यासाठी इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना का यावे लागते?, बॅटरी लावून अंधारात दुष्काळ दिसतो का? असा सवाल करून टंचाईच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याची टिकाही त्यांनी केली. जायकवाडी पाणी वाटपाबाबत बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नसताना जायकवाडीत पाणी सोडण्याचे का थांबले ? मराठवाड्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार, लोकप्रतिनिधी या प्रश्नावर का बोलत नाहीत?, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावाला शासन बळी पडले असून त्यामुळेच पाणी सोडण्यासाठी विलंब होत आहे, असेही ते म्हणाले. महिलांवरील अत्याचार या सरकारच्या काळात वाढले असून बीड जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची टिका राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या अ‍ॅड. उषाताई दराडे यांनी केली. राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जिल्हा सरचिटणीस कुमार ढाकणे, माजी उपनगराध्यक्ष फारु क पटेल, नगरसेवक खदीरभाई जवारीवाले, परदेशी मॅडम, प्रा.गोपाळ धांडे, जीवन जोगदंड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते....तर लोकसभा लढविणारलोकसभेसाठी मी स्वत:हून इच्छूक नाही परंतु पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढविणार. उमेदवार कुणीही असला तरी राष्टÑवादी काँग्रेसचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असे अमरसिंह पंडित यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडBadamrao Panditबदामराव पंडितJayakwadi Damजायकवाडी धरणwater scarcityपाणी टंचाई