पुलावर पथदिवे बसवण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबासाखर रस्त्यावर असलेल्या उड्डाणपूल परिसरात पथदिवे नसल्याने याठिकाणी अंधार असतो. या पुलाच्या बाजूला वस्ती असून, तेथील रहिवाशांना या पुलाचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
अंबाजोगाई : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी इंटरनेटसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदेव जाजू यांनी केली आहे.
अपघात विम्याची जाचक अट
अंबाजोगाई : शेतात कामे करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे यासह रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात व अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. काहींना अपंगत्व येते. यासाठी शासन विम्याद्वारे लाभ देतात. मात्र, जाचक अटीमुळे अनेकांना यापासून वंचित रहावे लागत आहे.या जाचक अटी रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.
बंद पथदिव्यांमुळे गैरसोय
अंबाजोगाई : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, रुग्णालय परिसर,व वार्डातील काही पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे सुरू दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.