शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या पगारातील २६ लाखांची कपात गायब, तत्कालीन मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 19:46 IST

अंजनडोह  केंद्राच्या तत्कालीन मुख्याध्यापकावर अखेर अपहाराचा गुन्हा दाखल 

धारूर ( बीड) : अंजनडोह  केंद्राचे तत्कालीन मुख्यध्यापक रमेश विष्णूपंत नखातेने शिक्षकांच्या पगारातील एलआयसी, इन्कम टॅक्स व इतर कपातीची रक्कम गायब केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने एक समिती नेमली होती. चौकशी अंती मुख्याध्यापक नखाते विरुद्ध 26 लाख 47 हजार 061 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गटशिक्षणाधीकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या माजलगाव तालुक्यातील शिंदे वस्ती तांड्यावर कार्यरत असणारे सहशिक्षक रमेश नखाते हे मागच्या काही महिन्यापासून चर्चेत आहेत. त्यांनी धारूर तालुक्यात अंजनडोह येथे प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापक असताना शिक्षकांच्या एलआयसी तसेच वेगवेगळ्या विमा पॉलिसी, आयकर, पतसंस्थेच्या कपातीत 26 लाख 47 हजार रुपयांचा अपहार केला होता. सदरील प्रकार तीन वर्षापूर्वी उघडकीस आला होता. यावर शिक्षण विभाग कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत होत. परंतु शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर रमेश नखातेस तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर नखातेस माजलगाव तालुक्यातील शिंदे वस्ती येथील तांड्यावरील शाळेत सहशिक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली. मात्र त्यांनी अपहाराची रक्कम जमा केली नव्हती. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी सुरू होती. यात पाच लाख ऐंशी हजार रुपयांची रक्कम भरण्यात आली होती. उर्वरित 20 लाख 67 हजार रुपये रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मुदत देऊन ही नखाते यांनी रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. यामुळे शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. यावरून आयुक्तांनी तात्काळ कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल. 

दरम्यान, 13 मार्च रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. यावेळी रमेश नखाते गैरहजर राहिले. त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात आज रमेश नखाते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :BeedबीडEducationशिक्षणCrime Newsगुन्हेगारी