शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका निभवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:02 IST

अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.

ठळक मुद्देआस्तिककुमार पाण्डेय : अयोध्या प्रकरणी संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आवाहन

बीड : अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाचा सर्वांनी आदर करावा. निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखावा. मानवता हाच खरा धर्म असून एकमेकांना सहकार्य, प्रेम ही खरी या धर्माची शिकवण आहे. सर्वांनी त्याचे पालन करावे. समाजकंटक आणि अपप्रवृत्ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नयेत. असे मजकूर सुजाण नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाच्या किंवा सायबर सेलच्या निदर्शनास आणावेत. शांतता समितीचे सदस्य शांततादूत आहेत. त्यांनी समाजापर्यंत, युवा पिढी, महिलांपर्यंत हा संदेश पोहोचवाव असे मत जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील पाण्डेय यांनी यावेळी केले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व धर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.निकाल आदरपूर्वक स्वीकारावा : पोद्दारजिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणावरील आगामी निकाल हा संपूर्ण न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल असून तो कोणतीही जात, धर्म, पंथ यांच्याशी जोडलेला नाही. त्यामुळे सर्वांनी तो आदरपूर्वक स्वीकारावा.पोलीस प्रशासन नि:पक्षपाती असल्याबाबत खात्री बाळगा. पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नये. आक्षेपार्ह मजकूर निदर्शनास आल्यास पोलीस स्टेशन, सायबर सेल यांच्या निदर्शनास आणावेत.पोलीस प्रशासन सामाजिक सुरक्षततेसाठी कटिबध्द असून हुल्लडबाजी करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्ह्यात १४ ठिकाणी नाकाबंदीअयोध्या प्रकरणी निकालासंदर्भात पोलीस प्रशासनाने योग्या ती कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान कृती आराखड्याची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, यासंदर्भात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विविध बैठका घेण्यात येत आहेत. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल २४ तास कार्यरत आहे. पथसंचलन, जमावबंदी आदेश, १४ ठिकाणी नाकाबंदी, मोहल्ला बैठका, कोबिंग आॅपरेशन आदि आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय