शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

उन्हाळा आला तरी मिळेना पीक विमा अग्रिम; आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी पाहायची वाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:07 IST

पीकविमा अग्रिम मिळण्यास जवळपास सहा महिन्यांचा विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळण्यास अधिक विलंब लागू शकतो.

बीड : खरीप हंगाम २०२४ मधील पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा अग्रिम मिळालेला नाही. उन्हाळा सुरू झाला तरी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहायची, असा सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

पीकविमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी केवळ १ रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केली होती. त्यामुळे या योजनेत अनेक शेतकरी सहभागी झाले होते. १ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदवित आपली पिके संरक्षित केली होती. दरम्यान, खरीप हंगामातील पीकविमा नुकसानभरपाई ही सर्वसाधारणपणे दिवाळीच्या आसपास दिली जात असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. परंतु मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका असल्याने पीकविमा अग्रिम शेतकऱ्यांना देता आला नाही. आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली मात्र त्यानंतर लगेचच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अग्रिम मिळणे अपेक्षित होते. परंतु राज्याचा हप्ता मिळण्यास विलंब झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम थेट अग्रिमवर झाला आहे. 

१४ मार्च तारीख आली, अधिकृतरीत्या उन्हाळा सुरू झाला तर पावसाळ्यातील खरीप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने आणखी किती दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात २०२४ खरीप हंगामाचे क्षेत्र ७ लाख ८५ हजार ७८६ पेरणी क्षेत्र होते. त्यापैकी ७ लाख ७४ हजार ८४८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला ७ लाख ७५ हजार ६६२ एवढ्या क्षेत्रावर पीकविमा काढला गेला. एकूण पेरण्यांपैकी १९ हजार १८६ हेक्टरचा पीकविमा भरला गेला नव्हता. खरीप २०२३ मध्ये शासकीय जमीन दाखविल्याचा घोटाळा समोर आल्याने २०२४ च्या खरीप हंगामात कमी प्रमाणात विमा भरला गेला.

नऊ लाखांवर शेतकरी पात्रसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०२४ मध्ये १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील नऊ लाख ८१ हजार शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहेत. यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारात ६ लाख ७८ हजार, तर वैयक्तिक या प्रकारात ३ लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना अग्रिम मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मग पूर्ण विमा कधी मिळणार?पीकविमा अग्रिम मिळण्यास जवळपास सहा महिन्यांचा विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळण्यास अधिक विलंब लागू शकतो. राज्य शासनाचा ७५० कोटी रुपयांचा हप्ता एआयसीकडे जमा झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु आजपर्यंत अग्रिम वाटपाच्या कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. त्यामुळे आणखी विलंब लागतो की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र