शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"स्मृतीदिनानिमित्त यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल,पण..."; पंकजा मुंडे यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 19:20 IST

''४ जूनला विजयाचा मोठा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण अर्पण करूया.''

परळी ( बीड) : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा येत्या ३ जून रोजी स्मृतीदिन आहे तर ४ जून रोजी लोकसभा मतमोजणी आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ''लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दहावा स्मृतीदिनी ३ जून रोजी यावर्षी गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा'', असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रदर्शित करून पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांना विनंतीवजा आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, ''दरवर्षी 3 जून हा दिवस येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये कालवल्यासारखं होतं. मुंडे साहेबांसारखा नेता, आपलं उर्जास्थान, आपलं शक्तीस्थान, आपलं प्रेरणास्थान, आपलं श्रध्दास्थान आपल्यातून गेले ३ जून यादिवशी..माझा पिता हरवला, तुमचा नेता हरवला. माझ्या पित्यावर, माझ्या नेत्यावर तुम्ही प्रेम केलं. आज दहा वर्षे झाली त्यांना जावून पण तरीही तुम्ही न चुकता ३ जूनला गोपीनाथ गडावर येता. यावेळेस एक योगायोग आलेला आहे तो म्हणजे ३ जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ४ जूनला लोकसभेची काऊंटिंग आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, काऊंटिंग एजंटला ३ जून रोजी संध्याकाळीच बीडला जावे लागते. कारण पहाटे उठूनच त्यांना काऊंटिंगसाठी जावे लागते. मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे. आपली सगळ्यांची इच्छा असून देखील आपल्या सर्वांना यायचं असून देखील ही तळमळ मी समजू शकते. म्हणून मीच तुमची ही अडचण दूर करायचं ठरवलं आहे.''

जिथे आहात तिथूनच पुण्यस्मरण करा''मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की, आपण जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा. मुंडे साहेबांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा आणि आपण यावर्षी गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल. ४ जूनला विजयाचा मोठा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण अर्पण करूया. यावेळेस आपण नाही आलात याविषयी मनामध्ये कुठलेही दुःख बाळगू नका. आपण पुढच्या वेळी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप चांगले समाजोपयोगी कार्यक्रम करू, त्यावेळी फार मोठया संख्येने आपण उपस्थित रहा. दरवर्षीप्रमाणे आमचं कीर्तन असतं, भोजन असतं ते देखील आम्ही यावर्षी रद्द केलेलं आहे. आपली अडचण टाळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.'' असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBeedबीड