शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या पंचहत्तरीतही हेमा मालिनी नृत्यास समर्पित; राधा रासबिहारी संगीतनाट्यास प्रेक्षकांची दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 19:01 IST

राधे राधे चा जयघोष! अभिनेत्री,खासदार हेमामालिनी यांच्या प्रमुख भूमिकेतील राधा रासबिहारी संगीत नाट्यात प्रेक्षक तल्लीन 

परळी  -  येथील नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवात  मंगळवारी सायंकाळी ड्रीम गर्ल, सिने अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिकेतील 'राधा रासबिहारी' या संगीत नाट्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार हेमा मालिनी पहिल्यांदाच परळीत आल्याने या कार्यक्रमाचे परळीकरांमध्ये आकर्षण होते. वयाच्या पंचहत्तरी पूर्ण केलेल्या हेमा मालिनी यांचा नृत्य आणि अभिनयाप्रति समर्पण पाहून प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. 

'राधा रासबिहारी' या संगीत नाट्यातील विविध वेशभूषेतील ५० कलाकारांचे दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः हेमा मालिनी यांनी केली आहे. अभिनय, दिग्दर्शन त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराच्या मेकअप पासून ते वेशभूषेपर्यंत सर्व गोष्टींवर हेमा मालिनी स्वतः नजर ठेवून होत्या. अभिनेत्री हेमामालिनी यांनी साकारलेल्या राधेने आणि सोबतच श्रीकृष्ण व गोपिकांची रासलीला, सुदामापासून कंसापर्यंतच्या विविध साकारलेल्या भूमिकांच्या सादरीकरणाने परळीकरांना अक्षरशः तल्लीन केले. 

अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांचे नाथ प्रतिष्ठानच्यावतीने राजश्री धनंजय मुंडे यांनी स्वागत केले. त्याचबरोबर नाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आलेल्या सर्व कलाकारांचे यथोचित स्वागत यावेळी करण्यात आले. निता बाजपेयी यांनी संगीत नाट्याचे बहारदार संचलन केले. यावेळी राधे राधे ,गणपती बाप्पा मोरया अशी मनोगताची सुरुवात करत हेमा मालिनी यांनी परळीत आल्यानंतर चांगले वाटले. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक चळवळ जोपासली आहे, असे कौतुक केले.

टॅग्स :BeedबीडHema Maliniहेमा मालिनीGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024Dhananjay Mundeधनंजय मुंडे