शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

बीड जिल्ह्यात मंजुरीनंतरही निम्म्याच चारा छावण्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 19:10 IST

मंजूर होऊनही चारा छावण्या सुरू नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. 

- प्रभात बुडूख 

बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शासनाने मागेल त्या ठिकाणी चारा छावण्यांना मंजुरी दिली. मात्र मंजूर केलेल्या ८३७ छावण्यांपैकी ११५ छावण्या सुरू न झाल्यामुळे त्यांची मंजुरी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे परिसरात मंजूर होऊनही चारा छावण्या सुरू नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. 

जिल्ह्यातील जनावरांची संख्या १२ लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी ८ लाख २२ हजार गाय आणि म्हैस वर्गातील जनावरे आहेत. आजघडीला जिल्ह्यात ८३७ छावण्यांना मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी ४६९ चारा छावण्या कार्यरत आहेत. मात्र, मंजुरी मिळूनदेखील मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पशुपालक मात्र अडचणीत आला. 

मंजुरीनंतर चारा छावणी सुरू करण्यास प्रशासनाने आठ दिवसांची मुभा दिली होती. त्यानंतर मंजुरी मिळूनदेखील सुरू न झालेल्या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार चारा छावण्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

115 चारा छावण्या केल्या बंद जिल्ह्यात सर्वाधिक बीड तालुक्यात ३०० तर आष्टी तालुक्यात २९३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी आष्टीत १६४ छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर मंजुरी असूनदेखील कार्यरत न केलेल्या ११५ चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. इतर तालुक्यातील सुरू न झालेल्या छावण्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. 

भरारी पथकांची नेमणूकयापूर्वी चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. हा सर्व प्रकार तत्कालीन जिल्हाधिकारी व आताचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उघड करून छावणीचालकांवर कारवाई केली होती. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून, गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

गैरप्रकार आढळ्यास कारवाई चारा छावण्यांवरील नियंत्रणासाठी संबंधित अधिकारी व तहसीलदारांना योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्यक्ष छावण्यांवर जाऊन आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे गैरप्रकार टाळता येतील. जर कुठे गैरप्रकार आढळून आले तर चारा छावणीचालक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. - रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय