शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतरही गतिमंद तरूणाच्या मृत्यूचे गुढ उलगडेना; पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 13:33 IST

नदीपात्रात वर्षभरापूर्वी एका ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.

- नितीन कांबळे कडा (बीड) : तालुक्यातील डोईठाण येथील नदीपात्रात वर्षभरापूर्वी एका ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, एक वर्षाचा कालावधी उलटला तरीही औरंगाबादहून शवविच्छेदन अहवाल मिळाला नसल्याने तरुणाच्या मृत्यूचे गुढ उलगडले नाही. आणखी किती दिवस अहवालाची प्रतिक्षा करावी लागणार याची चर्चा सुरु आहे. 

आष्टी पोलिस ठाणे हद्दीत बीड नगर राज्य महामार्गावरील सांगवी पाटण येथील गतिमंद तरुण ईश्वर त्र्यंबक सुरवसे याचा मृतदेह मागील वर्षी १६ आक्टोबर रोजी डोईठाण येथील नदीपात्रात आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. 

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल राखून ठेवत मृतदेहाचे काही नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र, वर्ष उलटले तरी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेतून अहवाल पोलिसांना मिळाला नाही. यामुळे तरुणाच्या मृत्यूचे गुढ गुलदस्त्यात आहे. या अहवालासाठी आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार, अशी चर्चा ग्रामस्थात सुरु आहे. पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी देखील अहवाल अद्याप मिळाला नसल्याची माहिती दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड