शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:08 IST

इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन : बीडमधील २० शाळांचा सहभाग

बीड : इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला.मागील सहा वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे विविध प्रश्न सोडविण्याचे काम इन्डिपेंडन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशन करीत आहे. या शाळांच्या समस्यांबद्दल शासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. मात्र दखल घेतली जात नसल्याने २५ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.राज्यातील जवळपास ७ हजार ५०० शाळा ईसा संघटनेच्या सभासद आहेत. बीडमधील २० शाळांनी बंदमध्ये सहभागी होत आंदोलनाला प्रतिसाद दिला.निखिल वाघमारे, भारती बांगर, श्रीमंत सानप, गणेश क्षीरसागर, गणेश धायतिडक, संदीप वारे, गणेश मैड, डॉ. फुलझळके, भागवत अगाम, कलीम इनामदार, सुमित बोर्डे, गोपाल शर्मा, दत्तात्रय देवगुडे, नुर पठाण, केदार वागमारे, नागसेन कांबळे, सुनील जोशी, अर्जुन राठोड, अमर भोसले, भैय्या तोष्णीवाल आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.या मागण्यांसाठी झाले आंदोलन१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा, २०१२ ते २०१३ पर्यंत आरटीई २५ टक्के प्रवेशाची थकित परतावा रक्कम मिळावी. राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करावा, १८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी. शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये मुख्याध्यापकाऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर ही जबाबदारी सोपविण्यात यावी. स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर दर्जावाढ प्रस्तावासाठी आॅनलाईन प्रक्रिया तातडीने सुरु करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन होते.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रenglishइंग्रजीSchoolशाळाStrikeसंप