शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या शासकीय रुग्णालयातून फरार अट्टल गुन्हेगार २४ तासाच्या आत जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:27 IST

शासकीय रुग्णालयातून पलायन केलेला अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा जाधवला २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले. जाधवला सकाळी ९ लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून ताब्यात घेण्यात आले.

बीड  : काल शासकीय रुग्णालयातून पलायन केलेला अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा जाधवला २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले. जाधवला सकाळी ९ वाजता लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून ताब्यात घेण्यात आले.

आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर आरोपी जाधव याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बालाजी जाधव (रा. रूपचंद नागर तांडा, जि. लातूर) याने पलायन केले. त्याच्या शोधासाठी बीड पोलिसांची पथके तत्काळ रवाना झाली होती. यातीलच एका पथकाने आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आरोपी जाधवला लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून ताब्यात घेतले. 

अशी झाली कारवाई रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी .पी . मुंडे यांनी बीड पोलिसांच्या माहितीवरून आरोपी जाधवच्या शोधासाठी एक पथक तयार केले होते. पथकाने सोमवारी रात्रभर त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. आज सकाळी पी.आय. मुंडे यांना तो रेणापूर शहराच्या आजूबाजूस असल्याची खबर मिळाली. यावरून रेणापूर पोलिस व लातूर एलसीबीच्या पथकास तो पिंपळफाटा येथे एका हॉटेलवर वेषांतर केलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला बीड पोलीसांच्या स्वाधीन केले. या कारवाईत पीएसआय शिंगणकर, पोलीस कर्मचारी के बी गारूळे, पी. आर. सूर्यवंशी, डि.बी. शिंदे, एस.सी. गायकवाड, एस. एम. ठाकरे, एस.व्ही. नागुरे, एन. एस मालवदे, अगंद कोतवाड यांचा समावेश होता

जाधवने आणले जेरीस १५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून ज्ञानोबाने भिंतीवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला होता; परंतु उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय मोडले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. पुन्हा २४ मार्च रोजी शौचास जाण्याचा बहाणा करीत तो शौचालयात गेला व खिडकीतील काचाने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातून बचावल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू होते.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकBeedबीडlaturलातूरPoliceपोलिस