शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:03 IST

बीड जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी अंबाजोगाईकर गेल्या ३० वर्षांपासून करीत आहेत.

अंबाजोगाई :बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा. या मागणीसाठी येथील यशवंतराव चव्हाण चौकात आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे एकतास वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या मोठ्या रांगा या परिसरात लागल्या होत्या.

अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीच्यावतीने क्रांतीदिनी जिल्ह्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यानुसार सर्व पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले. बीड जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी अंबाजोगाईकर गेल्या ३० वर्षांपासून करीत आहेत.

या मागणीकडे प्रशासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत जिल्हा निर्मिती होत नाही तोपर्यंत विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी जाहीर केले. आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाच्या वतीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आंदोलनाच्या परिसरात तैनात ठेवण्यात आला होता.

आंदोलनात माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, भाजपाचे नेते अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया, शिवसेनेचे गजानन मुडेगावकर, मनसेचे सुनील जगताप, रिपाई, काँग्रेस, पक्ष, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्यासह सर्वपक्ष, सामाजिक संघटना व कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकार