शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

डोहात वीज सोडून मासे पकडणे बेतले जीवावर; धारूरमध्ये दोन युवकांचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:16 IST

धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथील घटना

ठळक मुद्देएकजण करत होता पोलीस भरतीची तयारी दुसऱ्याने आयटीआयची परिक्षा दिली होती

धारूर  : धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथे मासे पकडण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन युवकांचा डोहात सोडलेला विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.समाधान सहदेव रुपनर ( 21) आणि  दिपक मारूती रुपनर ( 19 )अशी मृतांची नावे असून ते नात्याने चुलते-पुतणे होते. गुरूवारी सांयकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रुपनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काळ्याचीवाडी मुख्य रस्त्यापासून दुर डोंगरात आहे. सुट्टी असल्याने गावातील नात्याने चुलते-पुतणे समाधान सहदेव रुपनर ( 21) आणि  दिपक मारूती रुपनर ( 19 ) हे दोघे गुरूवारी दुपारी गावापासून एक कि.मी असणाऱ्या नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. डोहात विजेचा कंरट सोडून मासे पकडण्याची पध्दत त्यांना माहीत होती. दोघांनीही तसेच मासे पकडणे ठरवले मात्र हे त्यांच्या अंगलट आले. विजेचा शॉक लागून दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

गुरूवारी सांयकाळपर्यन्त दोघेही घरी परतले नाहीत म्हणून समाधानचे वडील काही ग्रामस्थांसह नदीकडे गेले. त्यावेळी त्यांना दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. मृतामधील समाधान हा पोलीस भरतीची तयारी करत होता, तर दिपक आयटीआयची परीक्षा देऊन आला होता. धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू होते.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडelectricityवीज