शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जाफराबादेत निसर्गाच्या कोपानंतर बळीराजाला वीजकंपनीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:21 IST

वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरवर लागवड : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रबीची पिके धोक्यात

जाफराबाद : वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.पूर्णा, धामना, केळणा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये यावर्षी सर्वाधिक रबीची पेरणी झाली. चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पिके चांगली आली. सध्या रबी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज आहे. परंतु, महिन्याभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. १० मिनिंटाला लाईट जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी असतानाही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील रबी हंगाम धोक्यात आला असून, शेतकरी चिंतेत सापडले आहे. निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हैराण झाल्याने शेतक-यांना महावितरण ‘शॉक’ देत आहे.कृषी पंपांना शासनाने भारनियमन ठरवून दिले आहे. अधिका-यांनी शासनाच्या भारनियमां व्यतिरिक्त अधिकचे भारनियमन सुरू केले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी नियोजन न करता आपल्या सोयीनुसार काम करीत असल्याचा आरोप शेतक-यांकडून होत आहे. याबाबत अभियंता डब्ल्यू. आर. गांधीले यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.लागवड : उसाच्या क्षेत्रात वाढयावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८ हजार ७०० हेक्टरवर पेरण्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात रबीच्या पिकाची लागवड जवळपास २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.पाऊस चांगला असल्याने यावर्षी शाळू ज्वारीची पेरणी ५ हजार ६२४, मका २ हजार ४०२, गहू ३ हजार ४३६, हरबरा ७ हजार २३६, करडई १० एकरवर पेरणी करण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यात उसाच्या क्षेत्रात देखील वाढ होणार असून, सीडस् कांद्याची सुध्दा शेतक-यांनी लागवड केली आहे. परंतु, सध्या पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके हातातून जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalanaजालनाmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी