शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

हीटरमधून बसला विजेचा धक्का; पती - पत्नीचा जागीच मृत्यू, कुटुंबावर आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 10:57 IST

केज तालुक्यातील घटना, पत्नीला वाचविताना पतीचाही झाला मृत्यू

- मधुकर सिरसटकेज ( बीड ):  तालुक्यातील पिंपळगाव (घोळवे )येथील पती, पत्नीचा पाणी तापविण्याच्या हिटरमधून बसलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (50) आणि इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (45) अशी मृतांची नावे आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे हे पत्नी इंदूबाई आणि आईसह पिंपळगाव येथे राहतात. आज पहाटे 4 वाजता झोपेतून उठल्यानंतर इंदुबाई या हिटर लावण्यासाठी पाण्याने भरलेली बकेट घेऊन विजेच्या बोर्डाकडे गेल्या. हिटर लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. हे लक्षात येताच ज्ञानेश्वर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दोघा पती, पत्नीचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मृतांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई आहेत. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी कुटुंबावर दोन आघातसुरवसे दाम्पत्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 अपत्य होते. 12 वर्षांपूर्वी 1 मुलगी पाण्यात बुडून मृत्यू पावली होती, तर दुसरीने 5 वर्षा पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एका मुलीचा विवाह झाला असून मुलगा बीडला शिक्षण घेतो आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू