शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:17 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर रविवारी अजित पवार गटाचीही सभा झाली.

बीड : सध्या मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. धरणांमधील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. हाच धागा पकडून आगामी काळात पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू. यासाठी १ लाख कोटी रुपये लागले तरी चालतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर रविवारी अजित पवार गटाचीही सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या काळात केलेली कामे आणि योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे स्थलांतर रोखले जाईल. कांदाप्रश्नी शेतकऱ्यांमध्ये अनेकांनी गैरसमज पसरवले. दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिल्लीला पाठवून हा प्रश्न मार्गी लावला.

कांद्याला प्रति किलो २४.१० रुपये भाव ठरवून २ लाख टन खरेदी केला. शेतकरी सध्या पाऊस नसल्याने अडचणी आहेत. त्यांना मदत आणि आधार देण्याचे काम हे युती सरकार करेल, असेही पवार यांनी सांगितले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय बनसोडे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल पाटील, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBeedबीड