शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचा वाद! आधी तहसीलदारांची माफियांविरोधात तक्रार;आता त्यांच्याविरोधात महिलांची फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 18:46 IST

दोन्ही घटनेने खळबळ उडाली असून आता वाळूचा वाद घरापर्यंत गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

गेवराई : घरात घुसून महिलांना धमकावल्या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींवर गेवराई पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सचिन खाडे यांना गुरुवारी वाळू माफियांनी धमकावले व कार्यालयात जाण्यापासून रोखले होते. त्यानंतर तहसीलदार खाडे यांनी देखील फिर्याद दिली आहे. या दोन्ही घटनेने खळबळ उडाली असून आता वाळूचा वाद घरापर्यंत गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

या विषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक १७ रोजी काही ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू घेऊन जात असल्याची माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना मिळाली होती. यावरून तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांच्यावर कारवाई केली. परंतू, त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तहसीलदार यांना बघून घेतो, अशी धमकी वाळूमाफियांनी दिली. याप्रकरणी तहसीलदारांनी गेवराई पोलिस ठाण्यात सोमनाथ गिरगे व अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. 

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कुसूम शिवाजी मोटे, स्वाती सोमनाथ गिरगे, सुनीता सुरेश भुंबे (सर्व रा.गेवराई) या महिलांनी तहसीलदार व अन्य सहा ते सात जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तिन्ही महिलांच्या तक्रारीनुसार, तहसीलदार सचिन खाडे हे सहा ते सात जणांना सोबत घेऊन घरी आले. गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरातील कोणत्याही व्यक्तींची परवानगी न घेता घरात प्रवेश केला. महिलांना तुम्ही वाळू प्रकरणातील आरोपी लपवून ठेवले, असे म्हणत धमकावले, असे नमूद केले आहे. याप्रकरणी तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात जणांविरोधात शुक्रवारी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि.संदीप काळे हे करत आहेत. २ दिवसांपूर्वी वाळू माफियांनी तहसिलदारांना धमकावले होते तहसीलदार सचिन खाडे यांना सोमनाथ गिरगे यासह अन्य दोन वाळू माफियांनी गुरुवारी घरी जाऊन धमकावले होते. तहसिलला जाण्यापासून अडविले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गुरुवारी दाखल झाला. या घटनेनंतर शुक्रवारी एकाच दिवशी तीन महिलांनी तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरोधात तक्रारी दिल्या. दरम्यान, या प्रकरणात वाळू माफियांचा हात असल्याची जोरदार चर्चा होत आहे. तर या प्रकरणी तहसीलदार सचीन खाडे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. 

टॅग्स :BeedबीडsandवाळूCrime Newsगुन्हेगारी