परळी : शहरात सर्वत्र रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. न.प.ने धुळीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
जनावरांचा ठिय्या
बीड : शहरातील रस्त्यांवरील अनेक मार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
घरकुलाचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थिंच्या खात्यावर टाकण्यात आले नाहीत. याबाबत मागणी करूनही आश्वासनाशिवाय काहीही मिळत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांची कसरत
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील पाणंद रस्ते परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. ते दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात येण्या- जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छता होईना
माजलगाव : शहरातील विविध भागांत घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून स्वच्छता करण्याची मागणी न.प.ने केली आहे.