शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडाचाही दसरा मेळावा पुन्हा वादात, तीन गावांतील ग्रामस्थांकडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 06:36 IST

भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काही वर्षांपूर्वी खंडित झाली होती.

अनिल लगड बीड : भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काही वर्षांपूर्वी खंडित झाली होती. ती पुन्हा भगवानगडाच्या पायथ्याशी सुरू करणार असल्याची भूमिका दसरा मेळावा कृती समितीने घेतली आहे; परंतु या मेळाव्याला गडाच्या पायथ्याशी असलेल्या नगर व बीड जिल्ह्यातील तीन गावांतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.     

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव, अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव घेऊन या मेळाव्याला विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी अहमदनगर व बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.  

संत भगवानबाबांनी सुरू केलेली परंपरा अखंडित सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीला स्थान न ठेवता यावर्षी भगवानगडावरील होणारा दसरा मेळावा हा धार्मिक व सांस्कृतिक पद्धतीने होणार आहे. वारकरी संप्रदाय हरिनामाचा गजर करीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. लेझीम, ढोल-पथक, वादक श्रीक्षेत्र भगवान गडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन भगवानगडापर्यंत जाऊन संपेल. त्यानंतर तिथे सीमोल्लंघन खेळण्यात येईल, असे कृती समितीने स्पष्ट केले.  

राजकीय मेळाव्याची परंपरा खंडित भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे हे गडावर दसऱ्याला मेळावा घेत असत. यानंतर महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना  येथे मेळावा घेण्यास विरोध केल्याने राजकीय मेळाव्याची परंपरा खंडित झाली होती.

टॅग्स :Beedबीड