शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातील औषधांच्या तुटवडयाने माजलगाव तालुक्यात रुग्णांचे हाल, तीन महिन्यांपासून करतात बाहेरुन औषध खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:03 IST

मागील तीन महिन्यांपासुन औषधांची मागणी वरिष्ठ कार्यालयांना केली असून यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने आणखी कारवाई केली नाही.  यामुळे मात्र, रुग्णांचे हाल होत असून त्यांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहेत. 

ठळक मुद्दे माजलगांव तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व 22 उपकेंद्रे आहेत.तीन महिन्याच्या काळात मोठया प्रमाणावर औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

- पुरुषोत्तम करवा माजलगांव ( बीड) -  तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये मोठया प्रमाणावर औषधांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. मागील तीन महिन्यांपासुन औषधांची मागणी वरिष्ठ कार्यालयांना केली असून यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने आणखी कारवाई केली नाही.  यामुळे मात्र, रुग्णांचे हाल होत असून त्यांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहेत. 

शासकीय आरोग्य केंद्र हीच ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी अत्यल्प शुल्क घेऊन उपचारासोबतच औषधदे सुद्धा मिळतात. माजलगांव तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व 22 उपकेंद्रे आहेत. शिवाय माजलगांव शहरात ग्रामिण रुग्णालय देखील आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये मागील तीन महिन्याच्या काळात मोठया प्रमाणावर औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

यातच सध्या वातावरणातील बदल आणि वाढत चाललेल्या संसर्गजन्य रोगांमुळे नागरीक बेहाल आहेत. अशा काळात रुग्णालयात उपचारासाठी येणा-यांची संख्या जास्त आहे. परंतु; येथे उपचारासोबत औषधी मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. रुग्णांना बाहेरुन गोळया औषधांची व्यवस्था करावी लागत आहे. यामुळे मोठया प्रमाणावर आर्थिक भुर्दंडाला रुग्णास सामोरे जावे लागते.

तीन महिने पहावी लागणार वाट जिएसटीच्या कारणावरुन टेंडर न निघाल्यामुळे आणखी तीन महिने औषधी उपलब्ध होऊ शकणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

गरजेपुरते औषध खरेदी करून दिलासा 

औषधांच्या तुटवडया संदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार तसेच अहवाल पाठविलेले आहेत. रुग्णांना गरजेपुरते औषधी खरेदी करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. - डॉ.अनिल परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी 

टॅग्स :Healthआरोग्य