शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

मराठी भाषेमुळे ग्रंथालयीन संप्रेषण गतिमान : संजय भेदेकर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

गेवराई : मानवी इतिहासाच्या प्रारंभापासूनच सुरू असणारे संप्रेषण मराठी भाषेमुळे अधिक गतिमान झाल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी ...

गेवराई : मानवी इतिहासाच्या प्रारंभापासूनच सुरू असणारे संप्रेषण मराठी भाषेमुळे अधिक गतिमान झाल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी केले.

येथील महिला महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’अंतर्गत संपन्न झालेल्या व्याख्यानात प्रा. डॉ. संजय भेदेकर बोलत होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर होत्या. ‘ग्रंथालयीन संप्रेषण आणि समाज यामध्ये मराठी भाषेची भूमिका’ या विषयावर बोलताना प्रा. डॉ. भेदेकर म्हणाले की, प्रारंभी संप्रेषणासाठी संकेतचिन्हांचा वापर केला जात असे. मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर संप्रेषणाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ग्रंथालय व्यवस्थापन अभ्यासक्रम मराठीमध्ये भाषांतरित केल्याने मराठी भाषिकांना खूप उपयोगी ठरला, असे सांगून प्रा. डॉ. भेदेकर यांनी ग्रंथालयांमध्ये मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनाला आणून दिले.

यावेळी भीष्मा रासकर यांनी प्राचीन काळापासून विविध कलांद्वारे संप्रेषण होत असल्याचे सांगितले. लोकसंस्कृतीनेही संप्रेषणात मह‌त्त्वाची भूमिका बजावली असल्याचे डॉ. रासकर म्हणाले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. बापू घोक्षे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव शिनगारे यांनी केले. प्रा. डॉ. प्रवीण शिलेदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागासह क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रवीण शिलेदार व प्रा. रामहरी काकडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला प्राध्यापक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.