शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

निधी संपल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने अंबाजोगाईतील उत्खननाचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:34 IST

शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले.

- अविनाश मुडेगांवकरअंबाजोगाई (बीड) : शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले. उत्खननातून पुढे काय काय निघते याची मोठी उत्सुकता लागलेली असताना निधी संपल्याचे कारण पुढे करीत काम बंद करण्यात आले. परिणामी अंबाजोगाईकरांच्या अपेक्षा पुन्हा लांबणीवर टांगण्यात आल्या आहेत. 

शहरातील पुरातन व ऐतिहासिक ठेवा असलेल्या सकलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर सुरू झाले होते. अंबाजोगाईकरांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने औरंगाबाद येथील उपसंचालक पुरातत्व विभाग यांना सकलेश्वर मंदिराच्या उत्खननासाठी वरिष्ठ पातळीवरून चार लाखांचा निधी प्राप्त झाला होता. आलेला हा निधी मार्च अखेरपर्यंत न संपल्यास तो निधी परत जातो. यामुळे पुरातत्व विभागाच्या वतीने १८ मार्च ते २८ मार्च असे दहा दिवस उत्खननाचे काम झाले. या उत्खननात मंदिराचा शोध लागला. तसेच अनेक दुर्मिळ अवशेष या उत्खननातून सापडले. नवीन निघालेल्या मंदिराच्या पाया भागात रंगशीळा, पुरातन विष्णूंची मूर्ती, तत्कालिन खापरी भांडयाचे तुकडे, दगडाप्रमाणेच विटा निघाल्या. पुरातत्व विभागाच्या सहा जणांच्या पथकाने दहा दिवसात हे काम केले. मात्र आता झालेले उत्खननाचे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेले नाही. 

पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनन झालेल्या परिसरात दक्षिण-पश्चिम बाजूस दगडी शिळेच्या पुरातन पायऱ्या निघाल्या. याचेही काम अर्धवट राहिले आहे. तर मंदिराच्या समोरील बाजूस मोठे कुंड असून हे कुंड आहे की तलाव आहे. हे उत्खननातूनच समोर येईल. मात्र, उत्खनन बंद झाल्याने ही कामे अपूर्णच राहिली. मंदिराच्या उत्तर बाजूस ज्या ढिगाऱ्याखाली मंदिर सापडले. त्या परिसरात त्रिदल मंदिर असावेत असा अंदाजही पुरातत्व विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. मंदिराचे गर्भगृह मंडळ हा भाग उत्खननातून समोर येईल. अशी अपेक्षा अंबाजोगाईकर बाळगून होते. मात्र, पुरातत्व विभागाने निधी संपला हे कारण पुढे केल्याने उर्वरित कामे ठप्प झाली आहेत. 

पर्यटकांची सुरू झाली होती मोठी गर्दीयेथील उत्खननातून मंदिराचा शोध लागल्याची बातमी लोकमतमधून प्रसिद्ध होताच मंदिराकडे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. उत्खननातून अनेक बाबी समोर येतील अशी अपेक्षा अंबाजोगाईकर बाळगून होते. सलग दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर उत्खननाचे काम अचानक थांबल्याने अंबाजोगाईकरांचा मोठा हिरमोड झाला आहे. 

निधी उपलब्ध होताच काम सुरूसकलेश्वर मंदिराच्या कामकाजासाठी पहिल्या टप्प्यात फक्त ४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यातले काम संपले पुढील काम करण्यासाठी निधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित काम सुरू होईल. मात्र, हे काम  पुन्हा सुरू होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागेल हे सांगता येत नाही. अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाच्या तंत्रसहाय्यक निलिमा मार्कंडे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

टॅग्स :Excavationउत्खननArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAmbajogaiअंबाजोगाईTempleमंदिर