शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:39 IST

पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

- प्रभात बुडूख 

बीड : पशुखाद्याच्या वाढत्या किंमती, सांभाळ करण्यावर दिवसेंदिवस वाढता खर्च त्यात दुधाला भाव नसल्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाईलाजाने बाजारात जनावरे विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. तर दुसरीकडे बाजारात जनावरांची संख्या वाढल्याने गाय-म्हैस व बैलांच्या किंमतीदेखील कमी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात दुधाचे रोजचे उत्पादन अंदाजे ६.२० लाख लिटर आहे. त्यापैकी जवळपास २.१० लाख लिटर दूध डेअरीच्या माध्यमातून विक्री केली जाते. परंतु दुधाच्या किंमती कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच बीड तालुक्यातील घाटावरील भागात खवा उत्पादनासाठी दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खव्याचे भाव देखील घसरल्यामुळे संकटात भर पडली आहे. 

दुष्काळी परिस्थिती, नापिकी यासाठी दुग्ध व्यवसाय हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जीवन संजीवनी ठरत होता. मात्र, दुधाचे भाव घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  दुधाला भाव नसल्यामुळे दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराकावर अधिक खर्च होत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने जनावरांची बाजारात कमी किंमतीत विक्री करावी लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

डेअरी व खवा भट्टीवर दुधाचा भाव १८ ते २४ प्रती लीटरप्रमाणे आहे. परंतु दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराक व चाऱ्याचा खर्च रोज ७०-१०० रूपये होतो. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अनुदानाची मागणीशासनाने डेअरीवरील दुधाचे भाव वाढवले तरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल व पशुधन शाबूत राहील. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी रोखण्यासाठी दुधाला प्रतिलिटर १० रुपये प्रमाणे फरक अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

१९ जून २०१७ ला दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी गायीचे दूध "२७ प्रतिलिटरने खरेदी करण्याचा अध्यादेश काढला. मात्र, राष्ट्रवादी पुरस्कृत कोल्हापूर, बारामती व पुणे जिल्हा दूध संघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आदेशाला स्थगिती मिळवली, असे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थिमध्ये शेती उत्पादनावर अवलंबून न राहता दुधामुळे जगण्यास बळ मिळत होते. परंतु दुधाचे भाव कमी झाल्यामुळे दुभती जनावरे विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभिर्याने विचार करावा व दुधाच्या किंमती वाढवाव्यात.- अशोक खंडागळे, दूध उत्पादक शेतकरी

टॅग्स :milkदूधBeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र