शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये लेखणी बंदमुळे ‘महसूल’ची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:16 IST

बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आमलेकर यांना वाळू माफियांनी ट्रॅक्टरमधून ओढून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. त्यामुळे जनतेची व प्रशासकीय पातळीवरील सर्वच कामे खोळंबली.सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महसूल विभागाचे ...

बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आमलेकर यांना वाळू माफियांनी ट्रॅक्टरमधून ओढून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. त्यामुळे जनतेची व प्रशासकीय पातळीवरील सर्वच कामे खोळंबली.

सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी एकवटले. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील घटनेचा निषेध करण्यात आला. तलाठी आमलेकर मारहाणीतील तसेच तलाठी कमलेश सुरावार यांना धमकी देणाºया आरोपींना अटक करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात झाली.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रवीण धरमकर, सुनील भुताळे, तहसीलदार रामेश्वर गोरे, अविनाश शिंगटे, हिरामण झिरवाळ, सुनील पवार, कोषागार अधिकारी एस. जी. भुतडा, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर राख, चंद्रकांत जोगदंड, सरचिटणीस महादेव चौरे, जयंत तळीखेडे, मध्यवर्ती संघटनेचे नवनाथ नागरगोज, राहुल शेट्टे, कोतवाल संघटनेचे अरविंद राऊत, तलाठी संघटनेचे अनिल सुत्रे, इंद्रजित शेंदूरकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.१३०० अधिकारी, कर्मचाºयांचे आंदोलनजिल्ह्यातील २ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, ५ उपविभागीय कार्यालये, ११ तहसील कार्यालये, ३ भूसंपादन कार्यालय, १ पुरवठा कार्यालय, भुसुधार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जवळपास ८० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी असे १३०० जण लेखणीबंद आंदोलनात सहभागी झाले.या आंदोलनामुळे नेहमी वर्दळ असणाºया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुकशुकाट होता. सध्या शैक्षणिक प्रवेशाचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध प्रमाणपत्र, दाखले मिळू शकले नाहीत. प्रशासकीय पातळीवरील आणि विविध प्रकरणांतील सुनावणीची कामे होऊ शकली नाहीत.

टॅग्स :BeedबीडRevenue Departmentमहसूल विभागagitationआंदोलनMarathwadaमराठवाडा