शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएसबी’चा संवाद बिघडला; बीड पोलिसांना निवडणूक काळात येणार अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 14:16 IST

डीएसबीत कोणाचा कोणावर वचक नसल्याने नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

बीड : पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विषेश शाखेतील (डीएसबी) कर्मचाऱ्यांचा संवाद ‘बिघडला’ आहे. सर्वसामान्यांचा विश्वास जिंकुन माहिती जमा करून ती गोपनिय ठेवणे त्यांच्यासाठी कठीन राहणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या ‘अति शहाणपणा’मुळे येणाऱ्या निवडणूक काळात बीडपोलिसांना आता ‘विशेष’ अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. डीएसबीत कोणाचा कोणावर वचक नसल्याने नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

जिल्हा विशेष शाखा मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरू पहात आहे. माध्यमांना व्यवस्थित माहिती न देणे, व्हिआयपी बंदोबस्तात त्रुटी ठेवणे, आंदोलनांची माहिती न ठेवणे, ठाणे प्रमुख आणि ठाण्यांतील विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलणे, असे प्रकार वाढले आहेत. येथील कर्मचारी कामचुकारपणा करून केवळ ‘मोबाईल’मध्येच गुंतलेले दिसतात. येथील अधिकारीही त्यांच्याकडे कानाडोळा करीत असल्याने त्यांना कोणाचीच भिती नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहेत. 

दरम्यान, बीडमधील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्ताची माहिती आणि स्कीमही जिल्हा विशेष शाखेला रात्री उशिरापर्यंत माहिती नव्हती. पोलीस उपअधीक्षक कार्यालय आणि बीड शहर ठाण्याला विचारा, असे सांगून डीएसबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हात झटकले होते. यावरून जिल्हा विशेष शाखा किती तत्पर आहे, याचा प्रत्यय सर्वांना आला होता. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी यापुढे असे होणार नाही, असे सांगितले होते. याबाबत जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत मानकर म्हणाले, सुसंवाद ठेवायला पाहिजे. ही कॉमन बाब आहे, यासाठी प्रशिक्षणाची गरज नाही.

निवडणूक काळात अडचणी वाढणारडीएसबीने नागरिकांशी संवाद ठेवून गोपनिय माहिती घेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा विशेष शाखा याला अपवाद आहे. येथील कर्मचाऱ्यांचा संवाद ‘अति शहाणा’ असल्याने त्यांना गोपनिय माहिती मिळणे अशक्य आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे बीड पोलिसांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीडElectionनिवडणूक