शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालकाचा कहर: कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 19:58 IST

लोखंडी सावरगाव टी पॉईंटजवळ उलटलेला कंटेनर जमावाने पेटवला

केज ( बीड) : शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजता, मांजरसुंबा  ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर (क्रमांक डीडी ०१ झेड ९७७१) मद्यधुंद अवस्थेतील चालकाने हयगयीने चालवल्यामुळे मोठा अपघात झाला. या घटनेत मीना प्रवीण घोडके (वय ३७, रा. चिंचोलीमाळी, ह. मु. टाकळी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर केज परिसरातील १९ जण जखमी झाले, त्यापैकी ८ जण गंभीर आहेत.

भरधाव वेगाने कंटेनर मांजरसुंबा येथून सुटला होता आणि वाटेत दिसेल त्या वाहनाला व माणसाला धडक देत केज बसस्थानक परिसरात आला. यानंतर संतप्त नागरिकांनी लोखंडी सावरगाव टी पॉईंटपर्यंत कंटेनरचा पाठलाग केला. या ठिकाणी तीव्र वळणावर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात उलटला. संतप्त जमावाने कंटेनर पेटवून दिला. अंबाजोगाई येथून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

गंभीर जखमींची नावेशेषेराव मारोती चंदनशिव (५२), कृष्णा हरिदास करपे (२०), बळीराम अप्पाराव पांचाळ (४०), कुमार बळीराम गायकवाड (५५), आशा रावसाहेब मुंडे (५०), सिद्धार्थ शिंदे (५२), फुलाबाई धोंडीराम सावंत (६०), श्रद्धा मधुकर चिंचकर (१८) यांना अंबाजोगाई येथील स्वराती ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी दिली.

वाहतूक पोलिसांचा अभाव ठरला घातकया घटनेनंतर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केज शहरातील चौकात वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने अपघातात अधिक जीवितहानी झाली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAccidentअपघात