शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावर असताना प्रॅक्टिस अन अधिकाऱ्यांना शिवीगाळ भोवली; डॉ. सुदाम मुंडेस चार वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 18:35 IST

औरंगाबाद उच्च न्यायालयाने, महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याच्या आरोपात डाॅ. सुदाम मुंडे यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली होती.

अंबाजोगाई (बीड): शासकीय कामात अडथळा करणे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपात डॉ. सुदाम मुंडे यास दोषी ठरवून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी चार वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बुधवारी न्यायाधीशांनी हा निकाल दिला.

औरंगाबाद उच्च न्यायालयाने, महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याच्या आरोपात डाॅ. सुदाम मुंडे यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यास जामीन देताना पाच वर्षांसाठी वैद्यकिय व्यवसाय न करण्याचा अटीवर जामीन दिला होता. तरीही त्याने न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवला होता. याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून बोगस डॉक्टर शोध समितीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२० रोजी डाॅ.सुदाम मुंडे याच्या दवाखान्यावर छापा मारला असता, त्या ठिकाणी चार रुग्ण उपचार घेताना निदर्शनास आले. तसेच वैद्यकीय व्यावसायाचे साहित्य व उपकरणेही सापडली. 

या छाप्यात तत्कालिन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. बिपीन पाटील, डॉ. कुर्गे, डॉ. मेढे हे सहभागी होते. या छाप्या दरम्यान डॉ. सुदाम मुंडेने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला होता. त्यामुळे डाॅ. मुंडेच्या विरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलिस निरीक्षक एकशिंगे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. 

याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) व्ही. के. मांडे यांच्यासमोर  झाली. त्यात सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरून व सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस शासकीय कामात अडथळा केल्याच्या चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, मेडीकल व्यवसाय कायद्यान्वये तीन वर्षे शिक्षा व इंडियन मेडीकल कौन्सील कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. अशोक विनायकराव कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. नितीन पुजदेकर व कोर्ट पैरवी गोविंद कदम व पोलिस कर्मचारी मंदा तांदळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडdoctorडॉक्टर