शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई येथील दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबरपासून होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 20:27 IST

तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व.प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने हे दुरदर्शन केंद्र अंबाजोगाईत कार्यान्वित झाले होते.

अंबाजोगाई-:अंबाजोगाई परिसरात पिंपळा धायगुडा येथे असलेले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. दरम्यान, याच ठिकाणी आकशवाणी एफएम केंद्र कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

२५ वर्षांपूर्वी जेव्हा दूरदर्शन कार्यान्वित झाले. तेव्हा अंबाजोगाईत प्रक्षेपण व्यवस्थित होत नव्हते. टिव्ही पाहण्यासाठी अंबाजोगाई व परिसरात घरावर २५ ते ३० फुटाचा अँटिना बसवावा लागत असे. ही गैरसोय दूर करण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व.प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने हे दुरदर्शन केंद्र अंबाजोगाईत कार्यान्वित झाले होते. त्यानंतर अंबाजोगाईसह परिसरातील ७० ते ८० कि. मी.च्या अंतरावर या केंद्रांच्या माध्यमातून प्रक्षेपण होत आहे. येथे आजही २० तांत्रिक, तज्ञांचा कर्मचारी वर्ग कार्यान्वित आहे, अशा सुस्थितीत असणारे हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय नवी दिल्ली येथील प्रसारभारती बोर्डने घेतला आहे. यानुसार ३१ ऑक्टोबरपासून हे कार्यालय बंद होणार असल्याचे  पत्र अंबाजोगाई केंद्राचे सहाय्यक अभियंता यांना प्राप्त झाले आहे. याच जागेवर एफएम सुरू कराअंबाजोगाई येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र ३१ ऑक्टोबर पासून बंद होत आहे. याच जागेवर आहे त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आकाशवाणीचे अंबाजोगाई एफएम केंद्र सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड संतोष लोमटे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनBeedबीड