शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दरोडेखोरांचा कहर; दरोड्यासाठी घराचे दार पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 13:10 IST

घर मालक बाहेर येताच बेदम मारहाण

ठळक मुद्देनांदूरघाटात दहशत श्वानपथक, डीवायएसपी तळ ठोकून

नांदूरघाट (जि. बीड):  दीड महिन्यापासून चोरट्यांनी नांदूरघाटमध्ये थैमान घातले आहे. रविवारी रात्री तर कहरच केला येथील सुभाष झाडबुके यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने १० ते १५  दरोडेखोरांनी दार पेटवून तसेच मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली. 

रात्रीच्या दीड ते तीनच्या दरम्यान पोलीस चौकीच्या मागील परिसरात बहुतांश घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. घरामध्ये प्रवेश न करता आल्याने दरोडेखोरांनी परिसरातील घरांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर  मोर्चा सुभाष झाडबुके यांच्या घरावर वळवला. घरामध्ये सुभाष झाडबुके त्यांच्या पत्नी व आई एवढेच होते. दरोडेखोर घरावर चढण्याचा प्रयत्न करत होते. खूप प्रयत्न केले तरी आतमध्ये प्रवेश करता येईना म्हणून दरोडेखोरांनी दार हत्याराने तोडायला चालू केले. हे प्रयत्न निष्फळ ठरल्याने देशी दारू टाकून दार पेटवले व दुसऱ्या बाजूने दरवाजा तोडणे चालू होते. या आवाजाने झोपलेले सुभाष झाडबुके जागे झाले. त्यांनी तत्काळ कामावर असणाऱ्या मुलाला उठवले. कशाचा आवाज येतोय म्हणून पाहण्यासाठी दुसऱ्या दाराने बाहेर आले. बाहेर येताच चार ते पाच जणांनी झाडबुके यांच्यावर हल्ला केला. उर्वरित चार ते पाच जण पाठीमागून दार तोडत होते. झाडबुके यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दरोडेखोरांनी काठ्याने मारायला चालू केले. झाडबुकेंच्या ओरडण्याने लोक जमा होताच दरोडेखोरांनी पलायन केले. त्यांना येथील ग्रामीण   रुग्णालयात उपचारास दाखल केले. या दरोड्यामध्ये चोरी झाली नाही. सुभाष झाडबुके यांच्या प्रसंगावधानाने व लोकांच्या जागरुकतेमुळे मोठा दरोडा टळला. 

हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरणसुभाष झाडबुके यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या घरात बंदूक असणारा आॅफिसर आहे त्या घरावर एवढा मोठा चोरट्यांचा हल्ला होतो तर आपले काय? या विचाराने व्यापारी वर्ग व मध्यम वर्ग भयभीत झाला आहे. पोलीस प्रशासनाने आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, नांदूरघाटमध्ये रोज रात्री पेट्रोलिंग चालू करावी, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीBeedबीड