शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या लेकाला पुन्हा उपोषण करण्याची वेळ देऊ नका', जरांगेंच्या आई-वडिलांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:32 IST

मनोज जरांगे-पाटील यांच्या जन्मभूमी मातोरीत गुलाल उधळला

बीड : मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाला अखेर यश मिळाल्यानंतर, त्यांच्या मूळगावी मातोरी (ता. शिरूर) येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. या विजयानंतर त्यांचे वडील रावसाहेब नाना जरांगे आणि आई प्रभाबाई यांनी सरकारला पुन्हा फसवणूक न करण्याचा इशारा दिला आहे.

सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचे वृत्त येताच, त्यांच्या जन्मभूमी असलेल्या मातोरी गावात आनंदाचे वातावरण पसरले. गावातील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रावसाहेब नाना जरांगे यांना पेढे भरवून आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. यावेळी बोलताना रावसाहेब जरांगे यांनी म्हटले की, “वारंवार आम्हाला उपोषण आणि आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. माझ्या लेकाची (मुलाची) तब्येत खूप खराब होत आहे. मराठा समाज माझ्या मुलासोबत आहे; पण आता सरकारने दगाफटका करू नये. पुन्हा पुन्हा मुंबईला येण्याची वेळ देऊ नका, आता मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावा. गुलालाचा अपमान करू नका, असे त्यांनी सांगितले.”

लेकानं २५ वर्षे आंदोलने केलीमाझ्या लेकानं २५ वर्षे आंदोलन आणि उपोषणे केली आहेत. आता त्याच्या अंगात ताकद राहिली नाही. सरकार साहेबांनी त्यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांच्या आई प्रभाबाई यांनी सांगितले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.

गुलालाची उधळण, पेढेही वाटलेजरांगे पाटलांनी ‘आपण जिंकलो आहोत’ अशी घोषणा करताच मातोरी गावात आनंदाचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी लगेच जरांगे-पाटील यांचे घर गाठत त्यांच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला पेढे भरवले. सोबतच गुलालाची उधळणही केली. रात्री ९ वाजेपर्यंत गावात विजयी मिरवणूक सुरू होती, असे जरांगे-पाटील यांचे पुतणे गोविंद यांनी सांगितले.

आई-वडिलांचा गावीच मुक्कामजरांगे-पाटील यांचे आई, वडील, भाऊ जगन्नाथ आणि त्यांचे कुटुंब हे गावी मातोरी येथेच राहतात. आंदोलनादरम्यान, पुरुष मंडळी मुंबईला गेली होती. घरी केवळ महिलाच असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीड