शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:54 IST

अंबाजोगाई शहरातील ज्ञानप्रबोधिनीच्या आंबेडकर चौकातील केंद्रावर हार विक्री सुरू

अंबाजोगाई (बीड) : वस्तीवर, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलां-मुलींनी भिक्षा न मागता स्वकष्टातून उदरनिर्वाहाचा नवीन मार्ग जोपासला आहे. दसऱ्यानिमित्त फुलांचे हार तयार करून विक्री सुरू आहे. समाजानेच त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्याकडून पुष्पहार खरेदी करण्याचे आवाहन ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे यांनी केले आहे.

अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक, व विविध ठिकाणी झोपडपट्टी व वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलां-मुलींसाठी ज्ञानप्रबोधिनी चे समन्वयक प्रसाद चिक्षे,त्यांचे सर्व सहकारी या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवितात. दसऱ्याच्या निमित्ताने या मुलांना स्वकष्टातून रोजगार उपलब्ध होऊन त्यांचाही सण गोड व्हावा.या उद्देशाने झेंडूच्या फुलांचे सुंदर व आकर्षक हार या  मुलांनी तयार केले आहेत. या हरांची विक्री व नोंदणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील "गोविंद" या ज्ञानप्रबोधिनी च्या केंद्रावर सुरू आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी  दसऱ्यासाठी लागणारे हार खरेदी करावेत.असे आवाहन प्रसाद चिक्षे यांनी केले आहे.

नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते झाले उदघाटनज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाईच्या या  उपक्रमाचे उदघाटन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोरजी मुंदडा यांच्या हस्ते अविनाश मुडेगावकर यांना झेंडूच्या फुलांचे हार देऊन झाले. ज्ञान प्रबोधिनी ही उदात्त विचार घेऊन काम करणारी संघटना आहे. आपण जे हाराचे मूल्य द्याल ते वस्तीवरील मुलांच्या आणि महिलांच्या कल्याणासाठी वापरले जाईल. यासाठी हार खरेदी करून सहकार्य करावे, असे आवाहन नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडDasaraदसरा