शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'आमची शाळा बंद करू नका, अन्यथा उसतोडणीस जावे लागेल'; विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:04 IST

मुख्यमंत्री साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल.

किल्लेधारूर (बीड) : जायभायवाडी येथे २० पेक्षा पटसंख्या कमी असल्याने गावातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डोंगर भागातील ऊस तोडणी करणाऱ्यांचे गाव असलेल्या येथील  शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांने व्यथित होत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. उसतोड कामगारांची आहोत, इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचे आपल्या पत्रात नमूद केल्याने या पत्रानंतर तरी शिक्षण विभागाला पाझर फुटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २०  पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जायभायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापकाने आपली शाळा आता बंद होणार असे विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे व्यथित झालेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळा बंद न करण्याची विनंती केली. दुसऱ्या शाळेत जायचे म्हणजे, छाती इतक्या पाण्यातून रस्ता आहे. आम्ही पहिली दुसरीचे मुले कसे जाणार? शाळा बंद झाली तर आम्ही देखील पालकांसारखे उसतोड मजूर बनू, असेही या विद्यार्थ्याने पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर विविध स्तरातून टीका होत आहे. आता या पत्रानंतर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.  

असे आहे विद्यार्थ्याचे पत्र: 

''मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र, पत्र लिहिल्यास कारण की,साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल. माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा उस तोड कामगार म्हणून ओळखला जाईल. म्हणून तुम्हाला माझी कळकळीच विनंती आहे की माझी शाळा बंद करू नका. जर माझी शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यात छातीपर्यंत पाणि आते आहे. आम्हाला त्याच पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली दूसरीची मुले आहोत मग आम्ही कसे जायचे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, माझी शाळा बंद करू नका. माझं गाव डोंगरांच्या कुशीत वसलेल आहे.- समाधान बाबासाहेब जायभाये''

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र